27.1 C
Latur
Monday, December 8, 2025
Homeमहाराष्ट्ररताळी झाली स्वस्त!

रताळी झाली स्वस्त!

पुणे : प्रतिनिधी
कृषि उत्पन्न बाजार समिती होलसेल भाजी बाजारपेठेत रताळ्यांची शनिवारी (दि. २९) विक्रमी आवक झाली. तब्बल ६५ हजार पिशव्यांची आवक झाल्याने दर ५०० ते ८०० रुपयांनी उतरला आहे. हा दर प्रति क्विंटल ७,००ते १,००० रुपयांवर पोहोचला आहे.

ढगाळ वातावरणामुळे शेतक-यांनी भात मळणी लांबणीवर टाकली असून, ते रताळी काढणीत मग्न आहेत. त्यामुळे रताळ्याची आवक वाढली आहे. कोथिंबीर शंभर जुडीचा दर ३०० ते ५०० रुपये आहे. कांदा दर प्रति क्विंटल १,००० ते १,७०० रुपये आहे.

बाजारात शनिवारी ७० ट्रक नव्या कांद्याची आवक झाली. किरकोळ बाजारात कांद्याचा दर प्रति किलोला २५ रुपये आहे. बटाटा दर प्रति किलोला ३० रुपये आहे. टोमॅटो ३० ते ४० रुपये आहे. कोथिंबीरही एक जुडी ५ ते १० रुपये आहे. मेथी ३० रुपये तीन जुडी, बिन्स किलोला ६० ते ७० रुपये. लालभाजी, शेपू, पालक आदींचे दर स्थिर आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR