- Advertisement -
लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर व परिसरातील रसिक श्रोत्यांसाठी महाराष्ट्रातील नामवंत कवींनी साकारलेली बहारदार काव्यमैफल ‘काव्यगंध-दरवळ कवितांचा’ कार्यक्रम काव्यगंध रसिक मंडळी, लातूर यांच्या वतीने येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात रविवार दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम पूर्णपणे बिगर-व्यावसायिक असून रसिक श्रोत्यांसाठी तो विनामूल्य खुला आहे. मराठी साहित्याचा समृद्ध वारसा जपणे आणि कवितेच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृत करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या काव्यमैफलीत महाराष्ट्रातील नामवंत कवी विशाल मोहीते (बुलढाणा), रोहित शिंगे (कोल्हापूर), यामिनी दळवी (मुंबई), नारायण पुरी (छत्रपती संभाजीनगर), रमजान मुल्ला (सांगली), विष्णू थोरे (नाशिक) हे आपल्या दर्जेदार कवितांचे सादरीकरण करणार आहेत. विविध विषयांवरील कवितांचा सुंदर मिलाफ रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, प्राथमिक शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे उपस्थित राहणार आहेत. तरी साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शब्दांच्या सुगंधाचा आस्वाद घ्यावा, असे
आवाहन काव्यगंध रसिक मंडळी, लातूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
- Advertisement -
















