24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeअंतरराष्ट्रीयरशियाचे ५० लष्करी तळ सज्ज!

रशियाचे ५० लष्करी तळ सज्ज!

शीतयुद्ध २.० । उत्तर ध्रुवासाठी मित्र राष्ट्रांमध्येच जुंपली; ‘समुद्री कॉरिडॉर’वर ताबा मिळवण्याचा खटाटोप

वॉशिंग्टन/मॉस्को/बिजींग : वृत्तसंस्था
जगाच्या नकाशावर उत्तर ध्रुवाजवळ असलेला पांढराशुभ्र ग्रीनलँड आता रक्तरंजित संघर्षाचे केंद्र बनण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड सुरक्षित करण्याच्या हट्टापायी थेट डेन्मार्क आणि नाटो देशांना आव्हान दिले आहे. पण हा संघर्ष केवळ जमिनीच्या तुकड्यासाठी नाही, तर आर्क्टिक महासागरातून निर्माण होणा-या नवीन ‘समुद्री कॉरिडॉर्स’वर ताबा मिळवण्यासाठी आहे. तज्ज्ञांच्या मते, हे ‘शीतयुद्ध २.०’ असून जो या मार्गांवर राज्य करेल, तोच जगाचा पुढचा ‘किंगमेकर’ ठरेल.

गेल्या काही दशकांत हवामान बदलामुळे आर्क्टिकमधील बर्फ वेगाने वितळत आहे. यामुळे दोन नवीन जागतिक मार्ग खुले होत आहेत. १. नॉर्थवेस्ट पॅसेज : हा मार्ग कॅनडा आणि ग्रीनलँडच्या मधून जातो. यामुळे अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरून आशियात जाण्यासाठी पनामा कालव्यापेक्षा ५,००० मैल कमी अंतर पार करावे लागेल. २. ट्रान्सपोलर मार्ग : २०५० पर्यंत जहाजे थेट उत्तर ध्रुवावरून जाऊ शकतील, असा अंदाज आहे. यामुळे शांघाय ते रॉटरडॅम हा प्रवास ३० दिवसांऐवजी अवघ्या १५ दिवसांत पूर्ण होईल. या मार्गांमुळे जागतिक पुरवठा साखळीचे नियंत्रण सुएझ कालव्याकडून आर्क्टिककडे सरकणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच अमेरिकन संसदेत ‘ॠ१ीील्ल’ंल्ल िअल्लल्ली७ं३्रङ्मल्ल ंल्ल िर३ं३ीँङ्मङ्म िअू३’ मांडला आहे. ‘आम्ही ग्रीनलँड शांततेने विकत घेऊ किंवा कठीण मार्गाने (लष्करी बळाने) ताब्यात घेऊ, पण रशिया किंवा चीनला तिथे पाय रोवू देणार नाही,’ असे ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले आहे. अमेरिकेसाठी ग्रीनलँड हा केवळ संरक्षणाचा भाग नाही, तर तो उत्तर अमेरिकेचा नैसर्गिक विस्तार आहे. येथील ‘पिटुफिक स्पेस बेस’ रशियाच्या अण्वस्त्र हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

ऑपरेशन आर्क्टिक एड्युअरन्स : ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेनंतर युरोपीय देशही सावध झाले आहेत. फ्रान्स, जर्मनी आणि स्वीडनने ग्रीनलँडच्या संरक्षणासाठी आपली लष्करी तुकडी पाठवण्याची घोषणा केली आहे. डेन्मार्कने ‘ऑपरेशन आर्क्टिक एड्युअरन्स’ अंतर्गत युद्धसराव सुरू केला असून, त्यांच्या नौदलाला ‘आधी गोळी झाडा आणि नंतर प्रश्न विचारा’ असे आदेश देण्यात आले आहेत.

‘ड्रॅगनबेअर’ विरुद्ध ‘अँग्लोस्फीअर’
एका बाजूला अमेरिका आणि त्याचे मित्र राष्ट्र आहेत, तर दुस-या बाजूला रशिया आणि चीनची ‘ड्रॅगनबेअर’ युती आहे. रशियाने आर्क्टिकमध्ये ५० पेक्षा जास्त जुने सोव्हिएत लष्करी तळ पुन्हा सक्रिय केले आहेत. दुसरीकडे, चीनने स्वत:ला ‘आर्क्टिक जवळचा देश’ घोषित करून ‘पोलर सिल्क रोड’ प्रकल्प सुरू केला आहे. चीनची नजर ग्रीनलँडमधील ‘रेअर अर्थ’ खनिजांच्या साठ्यावर आहे, ज्याचा वापर इलेक्ट्रिक वाहने आणि प्रगत क्षेपणास्त्रांमध्ये होतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR