26.3 C
Latur
Friday, July 18, 2025
Homeमहाराष्ट्ररश्मी ठाकरे यांच्यामुळे शिवसेनेत फूट

रश्मी ठाकरे यांच्यामुळे शिवसेनेत फूट

गोगावलेंनी टाकला बॉम्ब; राजकीय वर्तुळात खळबळ

रायगड : प्रतिनिधी
शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार गडगडले. शिंदेसेनेचे कोकणातील शिलेदार भरतशेठ गोगावले यांनी या फुटीच्या कारणाची पुन्हा एकदा उजळणी केली आहे. यावेळी त्यांनी आतापर्यंत कधीही न पुढे आलेला एक दावा केला आहे. या फुटीमागे वहिनींचे हात असल्याचा बॉम्बगोळा गोगावले यांनी टाकला.

शिवसेनेच्या फुटीने राज्यात राजकीय भूकंप झाला. शिवसेनेत उभी फूट हा आजही ताजा इतिहास म्हणावा लागेल. या फुटीचे कितीही रवंथ केले तरी ते संपत नाही. या फुटीमागील सल काही गेल्या शिवसैनिकांच्या मनातून जात नाही. त्या नाजूक जखमेवरील खपली निघते आणि रक्त भळभळते. वेदना आपसूक बाहेर पडतात.

आम्ही शिवसेनेमधून बाहेर पडायला अनेक कारणे आहेत. पण उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीचे खूप ऐकतात. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्रिपद हे एकनाथ शिंदे यांना दिले पाहिजे होते आणि आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्री पद द्यायला नको होते. पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती. पण उद्धव ठाकरे त्यांचे ऐकत होते. रश्मी ठाकरे यांचे नाव न घेता भरत गोगावले यांनी फुटीमागील अनेक कारणांपैकी रश्मी ठाकरे पण एक कारण असल्याचे म्हटले आहे. आमदार कार्यकर्त्यांसह त्यांना भेटायला जात तेव्हा त्यांना बसवून ठेवले जायचे. त्यांना उद्धव ठाकरे भेटत नसत.

महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे. पडद्याच्या पाठीमागून वहिनींचा हस्तक्षेप बराचसा होता. उध्दवसाहेबांच्या मनात अनेक गोष्टी असायच्या मात्र नंतर बदल व्हायचा.

आम्ही आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जात आहोत आणि कायम त्यांच्या सोबत आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपत आहोत. त्यामुळे पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह आम्हाला मिळाले आहे. दोन्ही ठाकरे एकत्र येणार होते पण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा चान्स पण गमावला, असा टोला गोगावले यांनी लगावला.

किशोरी पेडणेकरांकडून प्रत्युत्तर
भरत गोगावले यांना टू द पॉईंटला साक्षात्कार होत असतील तर मला वाटते आता यांचा पॉईंटच चुकला आहे. जे पॉईंट छेदण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणजे अधोगतीला पोहोचण्याची लक्षणे त्यांची दिसत आहेत. ज्या पद्धत्तीने पती-पत्नी, माँ माँ ज्या पद्धतीने घरात वागत होत्या, टिळा लावत होत्या त्याप्रमाणेच वहिनी भूमिका बजावत आहेत. रश्मी वहिनी ठाकरे घराण्याची परंपरा, संस्कार आहेत. तेच रश्मी वहिनी करत आहेत. साहेब ओरडले तर हेच लोक वहिनींना मध्यस्थी करायचे. आज तुम्ही ती मध्यस्थी राजकारणातला टू द पॉईंट म्हणून जर काढत असतील, तर याला म्हणतात बुद्धीची कीव करावी, बुध्दीची अधोगती बघावी, असा घणाघात त्यांनी घातला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR