‘राजमाता जिजाऊ’ या नव्या एस. टी. बसचे लोकार्पण उत्साहात

उदगीर : प्रतिनिधी
प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या एस.टी. बसचे लोकार्पण माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. बसचे पूजन करून फीत कापण्यात आले. यानंतर आ.संजय बनसोडे यांनी स्वत: बसमध्ये बसून बसची पाहणी केली आणि चालक व वाहक यांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रवाशांना सुरक्षित व दर्जेदार सेवा देण्याचे आवाहन केले.

यावेळी जि.प. चे बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार, रामराव राठोड, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, गटनेते अनिल मुदाळे, आगार प्रमुख अजय गायकवाड, नगरसेवक व्यंकट बोईनवाड, शिवकुमार कांबळे, धिरज कसबे, यमुनाजी भुजबळे, सर्जेराव भांगे, महेश बिरादार, शफी हाशमी, अरविंद गिलचे, विक्की भोसले, प्रकाश बिरादार, संदिप बिरादार, कमलाकर फुले, अभिजीत साकोळकर, रत्नाकर बिरादार, बाळू सगर, उर्मिला वाघमारे, वर्षा बनसोडे, ज्योती बानापुरे, शक्ती बलांडे, बाबासाहेब सूर्यवंशी, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. संजय बनसोडे म्हणाले की, ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना चांगल्या दर्जाची वाहतूक सुविधा उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. ‘राजमाता जिजाऊ’ बसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरेल. अशा उपक्रमांमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल.

यावेळी या उपक्रमाचे स्वागत करुन प्रवाशांना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे मत मान्यवरांना व्यक्त केले. लोकार्पण सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, बस व्यवस्थापनाचे पदाधिकारी, कर्मचारी नागरिक उपस्थित होते. नव्या बसच्या लोकार्पणामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आधुनिक सुविधा असलेली ही बस प्रवाशांसाठी निश्चितच लाभदायी ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news