लातूर : प्रतिनिधी
येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात एनसीसी कॅडेट्सना बी व सी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ७ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी, छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत असलेल्या मुलींच्या एनसीसी विभागातील एकूण ११ मुलींना बी प्रमाणपत्र व ८ मुलींना सी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
नेवासा येथे नुकत्याच झालेल्या एनसीसी शिबिरातील ड्रिल स्पर्धेत शाहू महाविद्यालयाच्या कॅडेट्सनी द्वितीय क्रमांक व समूह नृत्य स्पर्धेत लोकनृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांक प्राप्त केला. कॅडेट श्रद्धा कदम हिची ऑल इंडिया थल सेना कॅम्पसाठी ग्रुप लेव्हल वर तर सिनिअर अंडर ऑफिसर श्रद्धा निकम हिची आरडीसी करिता बटालियन लेव्हल वर निवड झाली. याबद्दल प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे, पर्यवेक्षक प्रा. सुदर्शन पाटील, डॉ. सुधीर जाधव, लेफ्ट. डॉ. अर्चना टाक, लेफ्ट. डॉ. महेश वावरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. कॅडेट सृष्टी बुके हिने सुत्रसंचलन केले. सिनिअर अंडर ऑफिसर श्रद्धा निकम व ज्युनिअर अंडर ऑफिसर वैष्णवी मुक्तापुरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
















