25.9 C
Latur
Wednesday, December 17, 2025
Homeमहाराष्ट्रराजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या तिकिट दरात वाढ?

राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या तिकिट दरात वाढ?

झेब्रा, सिंह, माकड दाखल होणार

पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्र आता आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने पुणे महापालिकेने तिकिट दरात तब्बल ५० टक्क्यांनी वाढ करण्याबाबतचा विचार सुरू केला आहे. पुढील काळात प्राणिसंग्रहालयात नवीन प्राणी दाखल होणार आहेत त्यामुळे खर्चामध्ये अधिक वाढ होणार आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, प्राणिसंग्रहालयासाठी महापालिकेकडून होणारा खर्च, मिळणा-या महसुलाच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक आहे. प्राण्यांच्या अन्नाचा खर्च, कर्मचा-यांचे वेतन, देखभाल आणि विस्तार योजनांवर मोठा निधी खर्च होत आहे, त्यामुळे तिकिट दरात वाढ करणे आवश्यक आहे, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले होते. परंतु तिकिट दरवाढीबाबतचा कोणताही प्रस्ताव अजून तयार करण्यात आला नसल्याची माहिती उद्यान विभागप्रमुख अशोक घोरपडे यांनी दिली. त्यामुळे सध्या तरी तिकिटांमध्ये वाढ होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्राणिसंग्रहालयात लवकरच झेब्रा, माऊस डियर, सिंह, माकड, तसेच मर्मोसेट, टॅमरिन आणि जंगली कुत्रे दाखल होणार आहेत. सर्प उद्यानाचे पुनर्विकसनही सुरू आहे. सध्या प्राणिसंग्रहालयात वाघ, बिबट, सिंह, अस्वल, काळवीट, चितळ, सांबर, चिंकारा, विविध माकडे, सर्प, सरपटणारे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR