राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर, पुणे विजेता

परभणी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, परभणी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी तसेच परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा दि. ३ ते ५ ऑक्टोबर दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल, परभणी येथे संपन्न झाली. या स्पर्धेत १७ वर्ष मुले गटात छत्रपती संभाजीनगर तर मुली गटात पुणे विभागाने बाजी मारली.

या स्पर्धेत १७ वर्ष मुले गटात अंतिम फेरीतील अमरावती विरुध्द छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा सामना अटीतटीचा होऊन ३-२ सेटमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाने सुवर्ण पदक पटकावले तर अमरावती विभागाने रौप्यपदक, पुणे विभागाने कांस्य पदक प्राप्त केले. १७ वर्ष मुली गटात अंतिम सामना पुणे विरुध्द लातूर दरम्यान ३-१ सेटमध्ये पुणे विभागाने सुवर्ण पदक, लातूर विभाग रौप्यपदक, कोल्हापुर विभाग कांस्य पदक विजेता ठरल्या.

या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी कल्याण पोले, प्रमुख पाहुणे टेबल टेनिस राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश माळवे, डॉ. रामेश्वर नाईक, डॉ. कौस्तुभ परताणी, सुशील कुमार देशमुख, प्राचार्य प्रिया ठाकूर, जिल्हा सहसचिव ज्ञानेश्वर पंडीत, क्रीडा अधिकारी सुयश नाटकर यांची उपस्थिती होती.

स्पर्धा यशस्वीतेसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुढे, क्रीड़ा अधिकारी रोहन औढेकर, चेतन मुक्तावर, गजानन तुडमे, भागवत दुधारे, धीरज नाईकवाडे, प्रकाश पंडित, इरफान सौदागर, सुमेध शिंदे, योगेश आदमे, आशिष परदेशी, सचिन इत्यादीनी परिश्रम घेतले. पंच प्रमुख मधूकर लोणारे, राज्य पंच संतोष आचरेकर, चिंतामणी इंगळे, हर्ष कांबळे, विकास दुर्ग, विश्वनाथ स्वामी, गौरव पत्तेवार, पवन देशमुख, निखिल गवळी, सुमित कुलदीपके, मनोज निकाळजे, श्लोक तगारी, युवराज सवणे, सिद्धेश बुलबुले, पांगरकर, साक्षी देवकते, तुषार जाधव, विवेक घुगे, विक्रम हातेकर, सिद्धेश दाभाडे यांनी काम पाहिले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43
Video thumbnail
Solapur Well Collapse: आंबे गावात विहीर खचली; चार जण मातीखाली अडकले, बचावकार्य सुरू
01:16
Video thumbnail
Latur Accident News: टाका पाटीजवळ भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
00:41
Video thumbnail
Latur Bank Election : लातूरचा मतदार सन्मान गहाण ठेवणारा नाही – आमदार अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य
05:40
Video thumbnail
Latur District Bank Election: योग्य उमेदवाराला मतदान करा – दिलीपराव देशमुखांचे आवाहन
01:10
Video thumbnail
Nanded News: आंतरपिकात गांजाची लागवड; 9 लाख 24 हजारांचा गांजा जप्त, किनवटमध्ये LCB ची कारवाई
00:43
Video thumbnail
Latur District Bank Election: धमक्या, द्वेषाशिवाय विरोधकांनी काही केलं नाही – धीरज देशमुखांचा प्रहार
04:38
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59

Latest news