टेबल टेनिसमध्ये तिस-यांदा पटकावले जेतेपद
पुणे : प्रतिनिधी
आयडीएच्या पुणे शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तिस-या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत पुण्यातील कोथरूड येथे रविवार, दि. ३ ऑगस्ट रोजी ही स्पर्धा पार पडली. यामध्ये टेबल टेनिसच्या एकेरी स्पर्धेत लातूर येथील प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ डॉ. महेश बिलापट्टे यांनी सलग तिस-यांदा विजेतेपद पटकावून हॅट्ट्रिक साधली. यासोबतच त्यांनी दुहेरीमध्येही जेतेपद पटकावून टेबल टेनिस स्पर्धेत लातूरचा नावलौकिक वाढविला.
पुण्यात तिसरी राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, संगमनेर आदी ठिकाणच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करीत डॉ. महेश बिलापट्टे यांनी तिस-यांदा जेतेपद पटकावून हॅट्ट्रिक साधली. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

