राज्यातील दोनच जिल्ह्यांत सर्व शाळांचे जिओ टॅगिंग पूर्ण; दोन हजारांहून अधिक शाळांची कार्यवाही प्रलंबितच

पुणे : राज्यात अद्यापही दोन हजारांहून अधिक शाळांनी ‘जिओ टॅगिंग’ची प्रक्रिया पूर्ण करण्याकडे पाठ फिरवली आहे. सर्व शाळांचे जिओ टॅगिंग झालेले राज्यात दोनच जिल्हे आहेत. राज्यातील सर्व शाळांबाबतची माहिती केंद्र शासनाच्या ‘यूडायस प्लस’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यात शाळा, विद्यार्थिसंख्या, शिक्षकसंख्या, शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा, संगणकीय सुविधा यांबाबत माहितीचा समावेश आहे. या माहितीचा उपयोग आणि वापर शासनस्तरावर विविध धोरणे, कार्यक्रमांची आखणी, तसेच अंमलबजावणी आराखडा तयार करताना होतो.

मात्र, गाव, चावड्या, वस्ती यांचे ठिकाण, लोकसंख्येची घनता, तसेच उपलब्ध जिल्हा, राज्यमार्ग, महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, दोन शाळांमधील अंतर, शाळांच्या नजीक शासनाच्या इतर विभागांद्वारे उपलब्ध सोयीसुविधा याबाबतची माहिती शालेय शिक्षण विभागाकडे उपलब्ध नसल्याने अंगणवाड्यांसह शाळांचे ‘जिओ टॅगिंग’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटरशी (एमआरएसएसी) करार करण्यात आला.

महाजीआयएस संकेतस्थळावरील ११ मे रोजीच्या आकडेवारीनुसार राज्यातील १ लाख ८ हजार १६५ शाळांपैकी १ लाख ६ हजार ६७ शाळांनी जिओ टॅगिंग प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर, २ हजार ९८ शाळांनी जिओ टॅगिंगची प्रक्रिया केलेली नाही. सर्व शाळांची जिओ टॅगिंग प्रक्रिया पूर्ण केलेले गडचिरोली (११९१) आणि भंडारा (१२८९) हे दोनच जिल्हे आहेत.

छत्रपती संभाजीनगर, नागपूरची पिछाडी
जिओ टॅगिंग न झालेल्या शाळांमध्ये छत्रपती संभाजीनगर, नागपूर जिल्ह्यातील शाळा सर्वाधिक आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४५२, नागपूर जिल्ह्यातील ३५३, कोल्हापूर जिल्ह्यातील १५८, धुळे जिल्ह्यातील १२७, नाशिक जिल्ह्यातील १२२, सांगली जिल्ह्यातील १२०, जालना जिल्ह्यातील ११६ शाळांनी जिओ टॅगिंग प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.

‘प्रक्रिया १३ मेपर्यंत पूर्ण करा’
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सहसंचालक श्रीराम पानझाडे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना शाळांच्या जिओ टॅगिंगची प्रक्रिया १३ मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30
Video thumbnail
नोएडामध्ये थरार! हायराईज सोसायटीच्या १२ व्या मजल्यावर भीषण आग; अनेक फ्लॅट्सना आगीचा विळखा
00:55
Video thumbnail
'पेड्डी' चित्रपटाच्या यशासाठी जान्हवी कपूर तिरुपतीच्या चरणी; ३,५५० पायऱ्या चढून पूर्ण केली नवसपूर्ती
00:58
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16

Latest news