राज्यातील हजारो निवासी डॉक्टर संपावर; ओपीडीतील रुग्णसंख्या घटली

मुंबई : प्रतिनिधी
‘बीएचएमएस’ पदवीधरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत सशर्त नोंदणी देण्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील सुमारे ७ हजार निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे. या आंदोलनामुळे मुंबईसह राज्यातील सरकारी रुग्णालयांतील ‘ओपीडी’ सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली असून शेकडो रुग्णांना उपचाराविना परतावे लागले.

आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग (आयसीयू) आणि नियोजित शस्त्रक्रिया सुरू ठेवण्यात आल्या असल्या तरी ओपीडीमधील वैद्यकीय सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या. अनेक रुग्णालयांमध्ये ओपीडीतील रुग्णसंख्या जवळपास ५० टक्क्यांनी घटल्याचे चित्र दिसून आले. परिणामी शेकडो रुग्णांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली, तर अनेकांना उपचार न मिळाल्याने घरी परतावे लागले.

जिल्हा रुग्णालयांतील निवासी डॉक्टर संपावर गेल्याने सरकारी रुग्णालयांतील नियमित सेवा प्रभावित झाली असून, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशन, महाराष्ट्र सिनियर रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन, मध्यवर्ती मार्ड आणि बीएमसी मार्ड सारख्या सहा मोठ्या डॉक्टर संघटना यात उतरल्या आहेत. आंदोलनात आयएमएचे महाराष्ट्रातील सुमारे ५० हजार सदस्य आणि १३ हजार निवासी डॉक्टर सहभागी असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवाय लाखोंच्या संख्येत खासगी रुग्णालये व क्लिनिकमधील डॉक्टरांनी नियमित रुग्णसेवाही बंद केल्याने काही प्रमाणात प्रभावित होणार असल्याची माहिती आयएमएच्या पदाधिका-यांनी दिली.

मुंबईत ओपीडी ठप्प
बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंदणी करू नये, या मागणीसाठी राज्यभरातील डॉक्टरांनी रुग्णसेवा बंद आंदोलन सुरूकेले . मुंबईतील केईएम, सायन, नायर, कूपर आणि जे. जे. या प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये आंदोलनाचा पहिला दिवस असल्याने ओपीडीवर काही प्रमाणात परिणाम झाला. शिवाय वरिष्ठ प्राध्यापक, शिक्षक व तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णसेवेची धुरा सांभाळल्याने रुग्ण सेवा सावरल्याचे चित्र होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26

Latest news