Homeमहाराष्ट्रराज्यात अवकाळी पावसाचा इशारा

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातही तापमानात मोठी वाढ झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. उष्णतेचा त्रास वाढलेला असतानाच हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी अवकाळी पावसाचा इशाराही दिला आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबईत उकाड्याची तीव्रता दिवसेंदिवस आणखी जाणवू लागली आहे. शहरात तीव्र उष्णतेची लाट निर्माण होत असल्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दिवस जसजसा पुढे जाईल तसतसे तापमान आणखी वाढण्याची शक्यता असून मुंबईतील काही भागांत पारा ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचू शकतो. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत पुढील काही दिवस मुख्यत: आकाश निरभ्र राहणार असून उष्ण आणि दमट हवामानाचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे शहरातील अनेक उपनगरांमध्ये उकाडा आणि दमटपणा अधिक जाणवण्याची शक्यता आहे.

लातूर, धाराशिव, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. तसेच पुणे, नांदेड, बीड आणि परभणी येथे वादळी वा-यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबईसह कोकण भागात उष्ण आणि दमट हवामानासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR