राज्यात इंधनाची ५२ टक्के अधिक खरेदी

मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या कांदा उत्पादक शेतक-यांच्या आंदोलनाच्या आणि इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांच्या आंदोलनाचा खरपूस समाचार घेतला, तसेच राज्यातील इंधन पुरवठ्याबाबत सर्व जिल्हाधिका-यांना महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.

कांदा दरावरून सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कालच केंद्र सरकारने कांदे खरेदीचा भाव साडेतीन रुपयांनी वाढवून जवळपास पंधरा रुपयांपर्यंत नेलेला आहे. कांद्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी देखील सुरू केलेली आहे. आम्ही केंद्र सरकारला या संदर्भात बैठक घेण्याची विनंती केली होती. उद्या संध्याकाळी त्या संदर्भात बैठक होणार आहे. कांद्याच्या संदर्भात राज्य आणि केंद्र सरकार चर्चा करत आहे. पंधरा रुपयांची खरेदी आपण सुरू केलेली आहे. शेतक-यांच्या संदर्भात राज्यातील सरकार संवेदनशील आहे. पण काही लोक विनाकारण याबाबत राजकारण करू इच्छितात.

त्यांना माझं सांगणं आहे की, राज्य आणि केंद्र सरकारने १५ रुपयांनी कांदा खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी असा निर्णय केला होता का ते दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करत आहोत. आम्हाला याची कल्पना आहे की, इतके करून भागणार नाही, अनेक गोष्टी कराव्या लागतील, त्यामुळेच केंद्र सरकारसोबत उद्याला बैठक आम्ही घेत आहोत. त्या बैठकीतून दीर्घकालीन उपाययोजना काय करता येतील याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे शंभर टक्के राजकीय आंदोलन आहे. कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत अशी मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महायुतीचे सरकार कांद्याच्या संदर्भात संवेदनशीलतेने काम करण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यात सध्या सुरू असलेल्या इंधन खरेदीच्या गोंधळावर आणि वाढत्या मागणीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यात कुठेतरी साठेबाजी होत आहे, असे देखील निदर्शनास येत आहे. त्यासंदर्भात पुरवठा आणि गृह विभाग आता कारवाई करतील. पेट्रोल संदर्भात जो काही सरासरी वापर आहे त्यापेक्षा २३ टक्के जास्त मागणी वाढली आहे. डिझेलच्या संदर्भात ही मागणी ५२ टक्क्यांनी वाढली आहे. काही ठिकाणी तर ७० टक्के जास्त पुरवठा झाला आहे. त्यामुळे साठेबाजी थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिका-यांना कडक सूचना
दरम्यान, राज्यात सध्या इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. मात्र, सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर पसरलेल्या अफवांमुळे नागरिक नेहमीपेक्षा ५२ टक्के जास्तीची इंधन खरेदी करत आहेत. या अतिरेकी खरेदीमुळे तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. ही ५२ टक्के अतिरिक्त इंधन खरेदी नेमकी कोण करतंय आणि यामध्ये कोण साठेबाजी करतंय, याचा तात्काळ शोध घेऊन पुरवठा व गृह विभागाने कडक कारवाई करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24
Video thumbnail
Nanded|तुकाराम मुंढे नांदेडला? शहरातील गुटखा विक्रेत्यांची धावपळ
00:32
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी अण्णाभाऊ साठे कुटुंब मैदानात;आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनाची तयारी
04:08
Video thumbnail
Latur|फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीआरची होळी
04:04
Video thumbnail
Latur|लातूर मध्ये अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण व फळवाटप
02:28
Video thumbnail
Latur|एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; लातुरात घंटानाद आंदोलन
02:44
Video thumbnail
Latur|पानपट्टी धारकांनी घेतला तुकाराम मुंडेंचा धसका; निम्म्याहून अधिक पानपट्ट्या
02:23
Video thumbnail
Latur|गुलाबपुष्प आणि लाडू देऊन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत;यशवंत विद्यालयाचा अनोखा स्वागत सोहळा
01:14
Video thumbnail
Latur|बैलगाडीतून शाळेत एन्ट्री! विद्यार्थ्यांचे नववधूप्रमाणे स्वागत
02:19
Video thumbnail
Latur|१० वर्षांचा अरविंद धावला १६ किलोमीटर; शिक्षणासाठी जिद्दीची अनोखी धाव
05:47
Video thumbnail
Pandharapur Accident News|दर्शनाहून परतताना मृत्यू! पिकअप पाण्यात कोसळली;८ भाविकांचा अंत
02:31

Latest news