राज्यात कुराशच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट; कोल्हापुरातील दाम्पत्याला अटक

पुणे : शहर पोलिस दलाच्या शिपाई भरती प्रक्रियेत कुराश या खेळाची बनावट प्रमाणपत्रे तयार करून खेळाडू आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या रॅकेटची व्याप्ती राज्यभर असल्याचे समोर आले होते. दरम्यान, आता या प्रकरणात कोल्हापूरच्या पुनगावकर दाम्पत्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि.१०) कोल्हापूरातून ताब्यात घेतले. श्रुती पुनगावकर (वय ४५), धैर्यशील पुनगावकर (वय ५१, दोघे रा. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
या प्रकरणात गेल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर आणि सचिव शिवाजी साळुंखे या दोघांना अटक केली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात चौघांना अटक केली असून, इतर काही जणांकडे अद्याप चौकशी सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

कुराश असोसिएशनच्या पदाधिका-यांनी गेल्या अकरा वर्षांत तब्बल एक हजारांहून अधिक प्रमाणपत्रे राज्यात वाटली आहेत. या प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाच्या विविध विभागांत किती जणांनी नोक-या मिळवल्या, याची पडताळणी पोलिस करत आहेत. त्यामुळे केवळ पुणे पोलिस दलातील १९ जणांपुरतेच हे प्रकरण मर्यादित नसून, राज्यातील विविध शासकीय भरती प्रक्रियांपर्यंत या रॅकेटचे धागेदोरे पोहोचल्याचा अंदाज आहे.

कोल्हापुरातून पुनगावकर दाम्पत्याला अटक केल्यामुळे या रॅकेटचे धागेदोरे कोल्हापूरपर्यंत पोहचल्याचे समोर आले आहे. याबाबत बोलताना सातपुते यांनी सांगितले, हे दाम्पत्य आरोपी सचिव शिवाजी साळुंखे याचे नातेवाईक आहेत. पुनगावकर हे कोल्हापुरात क्रीडा अ‍ॅकॅडमी चालवतात. आरोपींनी कुराश खेळाच्या प्रमाणपत्राच्या अनुषंगाने जे बनावट कागदपत्रे तयार केली, ही सर्व कागदपत्रे याच पुनगावकर दाम्पत्याच्या अ‍ॅकॅडमीत तयार करण्यात आली आहेत. तसेच जेव्हा साळुंखे याला अटक करण्यात आली, तेव्हा त्यांनी ही बनावट कागदपत्रे लपवून ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. साळुंखे आणि नागर यांच्याकडे केलेल्या चौकशीत पुनगावकर दाम्पत्याचे नाव समोर आले होते. पोलिसांनी या दोघांना गुरुवारी कोल्हापुरातून ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यानुसार पोलिसांनी दोघांचा या गुन्ह्यातील सहभाग निदर्शनास आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

आरोपींनी कुराश या खेळांमध्ये प्रत्यक्ष सहभागी न झालेल्या व्यक्तींना खेळाडू असल्याचे दाखवून प्रमाणपत्रे दिली. या प्रमाणपत्रांचा वापर राज्य सरकारच्या विविध विभागांमधील भरती प्रक्रियेत करण्यात आला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. शासनाच्या विविध विभागांतील भरतीमध्ये खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षण आहे. याच आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांचा वापर झाला का, याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुणे शहर पोलिस दलातील भरतीमध्ये अशा प्रमाणपत्रांच्या आधारे १९ उमेदवारांनी खेळाडू आरक्षणाचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यापैकी दहा जण प्रशिक्षणासाठी गेले आहेत, तर अन्य नऊ जणांचे प्रशिक्षण अद्याप सुरू झालेले नव्हते. भरती प्रक्रियेदरम्यान या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची क्रीडा विभागाकडून पडताळणी करण्यात आली होती आणि त्यांना मान्यताही देण्यात आली होती. त्यामुळे प्रमाणपत्रांची पडताळणी नेमकी कोणत्या आधारावर करण्यात आली, याचाही तपास पोलिस करत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41
Video thumbnail
शिक्षक द्या, नाहीतर कार्यालयातच शाळा! शिरूर अनंतपाळमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अनोखे आंदोलन
02:56
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03

Latest news