राज्यात तब्बल अडीच लाख शिक्षक ‘ऑल इन वन’!;एका शिक्षकाच्या खांद्यावर सर्व विषयांचे ओझे

मुंबई : प्रतिनिधी
पहिली ते पाचवी किंवा सातवीच्या प्राथमिक वर्गांना एकाच शिक्षकाने सर्व विषय शिकवण्याची प्रशासकीय चौकट अनेक दशकांपासून चालत आली असली, तरी बदलती संचमान्यता आणि शाळांच्या वर्गवारीनुसार भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे अशा विविध विषयांचे अध्यापन एकाच शिक्षकाला करावे लागत आहे. राज्यातील एकूण ७ लाख ४६ हजार ३७७ शिक्षकांपैकी २ लाख ४७ हजार १२७ (३३.११ टक्के) शिक्षक ‘ऑल इन वन’ म्हणून काम करत आहेत.

शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाकडे असलेल्या आकडेवारीतून विषयनिहाय शिक्षकांची माहिती समोर आली आहे. राज्यात पहिली ते बारावीपर्यंत एकूण १ लाख ८ हजार ९५ शाळा असून, यामध्ये २ कोटी १५ लाख ३२ हजार ३८९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

या अवाढव्य पटसंख्येसाठी ७ लाख ४६ हजार ३७७ शिक्षक राज्यात कार्यरत आहेत. या शिक्षकांपैकी तब्बल २ लाख ४७ हजार १२७ सर्व विषय शिकवण्यासाठी अव्वल स्थानी आहेत त्यानंतर स्वतंत्र विषयांमध्ये इंग्रजी शिकवणारे ८१ हजार ७१६, तर गणिताचे ७९ हजार ८०२, विज्ञानासाठी ५८ हजार ५१ आणि हिंदीसाठी ४३ हजार ७३१ शिक्षक आहेत.

तर दुसरीकडे एकूण शिक्षकांच्या आकडेवारीत पुणे जिल्ह्यात ७८ हजार ३३ शिक्षक सर्वाधिक आहेत तर त्यापाठोपाठ ठाणे (५०,४१५), नाशिक (४०,६५७), मुंबई (३७,७६६), नागपूर (३२,८००), छत्रपती संभाजीनगर (३२,१७९) आणि अहिल्यानगर (३०,९९५) इतके शिक्षक अहेत. सर्वात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी अवघे ५ हजार ७०१ शिक्षक कार्यरत आहेत.

तर विदर्भातील भंडारा (६,७००), गडचिरोली (७,८५२), वर्धा (७,९८६) आणि मराठवाड्यातील हिंगोली (८,२२६) या जिल्ह्यांमध्ये शिक्षकसंख्या दहा हजारांपेक्षा कमी आहेत. या जिल्ह्यांमध्येही ‘सर्व विषय’ शिकवणा-या शिक्षकांचा भार सर्वाधिक आहे; यात पुणे (२१,२९५), नाशिक (१५,२३५), ठाणे (१२,६५६), अहिल्यानगर (१२,०६१) आणि सोलापूर (११,४८८) या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दहा हजारांहून अधिक आहेत.

इंग्रजी-हिंदीच्या तुलनेत माय मराठीची उपेक्षा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याचा उत्सव साजरा केला जात असताना, प्रत्यक्ष शाळांमध्ये मात्र ‘माय मराठी’ शिकवण्यासाठी स्वतंत्र शिक्षकांची संख्या कमी आहे. इंग्रजी शिकवणारे ८१ हजार ७१६ आणि हिंदीसाठी ४३ हजार ७३१ शिक्षक कार्यरत असताना, राजभाषा मराठी शिकवण्यासाठी स्वतंत्रपणे नियुक्त शिक्षकांची संख्या अवघी ११ हजार ३३७ ( १.५२ टक्के) इतकी नगण्य आहे.

माध्यमिक स्तरावरही ओढाताण
केवळ प्राथमिकपुरता मर्यादित राहिलेला नसून माध्यमिक स्तरावरही पसरत आहे. प्राथमिक स्तरावर विषयानुसार नव्हे, तर विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक दिले जातात. यामध्ये माध्यमिकमध्ये ६० टक्के कला पदवीधर (भाषा व समाजशास्त्र -५ पैकी ३ शिक्षक) आणि ४० टक्के विज्ञान पदवीधर (गणित व विज्ञान -५ पैकी २ शिक्षक) असा तासिकांच्या विभागणीचा आकृतीबंध ठरलेला आहे. मात्र, संचमान्यतेतील जाचक अटींमुळे अनेक शिक्षकांची मंजूर पदे कमी झाली तर सेवानिवृत्त शिक्षकांच्या रिक्त जागांवर भरती न झाल्याने बहुतांश शिक्षकावर इतर विषय शिकवावे लागत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
गतवर्षी अति पावसामुळे कापसाच्या वाती तर यावर्षी वाती साठी देखील कापूस नाही
02:01
Video thumbnail
Latur|अवैध सावकारीला लगाम घालण्यासाठी लातूर पोलिसांचे मोठे पाऊल!
03:48
Video thumbnail
Latur|१२ ऑक्टोबरला प्राध्यापकांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
06:43
Video thumbnail
Latur|विहिरीत मुबलक पाणी, पण नळ कोरडेच! जलजीवन योजनेचा उदगीरमध्ये बोजवारा?
04:19
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54

Latest news