26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeमहाराष्ट्रराज्यात थंडीचा मुक्काम वाढणार

राज्यात थंडीचा मुक्काम वाढणार

जानेवारीमध्ये कडाक्याच्या थंडीचा अंदाज

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. गाव-शिवारात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. किमान तापमानात घट झाल्याने गुलाबी थंडीने नववर्षाचे स्वागत होणार आहे. वर्षाच्या सरत्या दिवशी राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार कायम राहणार आहे. तर नवीन वर्षात तापमानाचा पारा अधिक घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शिवाय पावसाप्रमाणे थंडीचा मुक्काम देखील लांबणीवर जाणार आहे.

सोमवारी परभणीत ६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड येथे ७.३ अंश सेल्सिअस, अहिल्यानगर येथे ७.७ अंश सेल्सिअस, तर धुळे येथे ७.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

गोंदिया येथे ९ अंश, तर जेऊर, नाशिक, भंडारा, बुलडाणा, नागपूर आणि यवतमाळ येथे १० अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. आज पहाटेच्या वेळी काहीसे धुके आणि दव पडल्याचे दिसून आले. शिवाय आज राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याबरोबरच थंडी टिकून राहण्याचा अंदाज आहे. दोन दिवसांनंतर किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR