राज्यात पावसाचा हाहाकार

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई, पुण्यासह कोकणातही पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. रत्नागिरीच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे पावसाचा मारा सुरू असताना रस्त्यावर दरडी कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तर कल्याणमध्ये भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. खेड, कल्याणसहित राज्यातील विविध भागात भीषण दुर्घटना घडल्या आहेत. विविध भागात घडलेल्या घटनांची माहिती समोर येत आहे.

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील दहिवलीमध्ये दरड कोसळून २ जण मातीच्या ढिगा-याखाली अडकले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले. त्यानंतर कॅबिनेट मंत्री उदय सामंत घटनास्थळी दाखल झाले आहेत. खेड तालुक्यातील दहिवली येथे आज पहाटे दरड कोसळण्याची घटना घडली. या दुर्घटनेतून एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या घटनेची माहिती मिळताच महसूल, पोलिस, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली.

नवी मुंबईत धावत्या बेस्ट बसमध्ये चालकाला फीट
नवी मुंबईच्या वाशीमध्ये नवीन टोलनाक्यावर एक मोठी दुर्घटना घडली. बेस्ट बसच्या चालकाला अचानक धावत्या गाडीत फीट आल्याने बसवरील ताबा सुटला. त्यानंतर बस टोलनाक्यावरील लेन नंबर ६ आणि ७ या दरम्यान आदळली. या भीषण अपघातात बसचालक गंभीर जखमी झाला आहे. तर बसमधील ३ ते ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. वाशी टोलनाक्यावर हा प्रसंग घडला आहे. किरण जाधव असे बसचालकाचे नाव आहे.

कल्याणमध्ये आरोग्य केंद्राची भिंत कोसळली
कल्याण पूर्वेतील ड मुख्य प्रभाग कार्यालय परिसरात दुर्गेश इमारतीलगत असलेल्या महापालिकेच्या आरोग्य केंद्राची भिंत कोसळली आहे. या घटनेमुळे इमारतीच्या पंपरूम आणि कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. आरोग्य केंद्राच्या खालची संरक्षक भिंत कोसळल्याने इमारतीलगतचा काही भाग धोकादायक बनला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news