राज्यात पुन्हा पावसाचा जोर ;अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या तीव्र उकाड्यानंतर हवामानात मोठा बदल झाला असून, १५ जुलै रोजी अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, काही भागांत जोरदार वा-यांसह पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वा-यांची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे १५ जुलै रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सध्या जम्मू, पाटणा मार्गे पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

या सर्व हवामान प्रणालींच्या एकत्रित परिणामामुळे राज्यातील अनेक भागांत वातावरण ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तर कोकणातील काही भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून, उर्वरित राज्यात काही ठिकाणी हलक्या सरींसह उष्णता आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

आज ठाणे, रायगड, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस व जोरदार वा-याचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याशिवाय मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा घाटमाथा, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड येथे तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरुवारी सोलापूर, धाराशिव आणि सातारा जिल्ह्यांत तुलनेने जोरदार पावसाचा अंदाज असून, कोकण व मराठवाड्यात हलक्या सरींची शक्यता आहे. शुक्रवारी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढू शकतो.

प्रादेशिक अंदाजानुसार पालघर येथे हलक्या पावसाची शक्यता आहे, तर ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. उत्तर महाराष्ट्रात धुळे व नंदुरबारमध्ये हलक्या सरी, तर नाशिक आणि जळगावमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगरमध्ये यलो अलर्ट लागू आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21

Latest news