26.2 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात मविआचेच सरकार येईल

राज्यात मविआचेच सरकार येईल

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल. मतदान झाल्यानंतर जे कौल समोर येत आहेत त्यानुसार काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येतील आणि महाविकास आघाडीचे सरकार काँग्रेसच्या नेतृत्वात येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत काय होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. २३ नोव्हेंबरला हा निकाल लागणार आहे. दरम्यान एक्झिट पोल्स समोर आले आहेत. एक्झिट पोल्सच्या अंदाजांनुसार राज्यात महायुतीचे सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र तीन एक्झिट पोल्सनी महाविकास आघाडीचे सरकार येईल असेही म्हटले आहे. दरम्यान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार येईल असे म्हटले आहे.

भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे पैसे वाटताना पकडले गेले. किती खोटं बोलणार? देवेंद्र फडणवीस यांचे पीए असणारे वानखेडे हे आर्वीमधून उभे आहेत. त्यांच्या मतदारसंघात दारूबंदी असतानाही गोडाऊनमध्ये दारू सापडली. वर्धा दारूबंदीचा जिल्हा आहे. दारू आणि पैसा यांचे वाटप करून हे नोट जिहाद करू इच्छितात का? भाजपाकडून व्होट जिहादचा नारा दिला जातो. खरंतर मतदान करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी जाहीर केलं की भाजपाला मतदान करणार, त्याला काय ब्राह्मणांचा जिहाद म्हणायचे का? काय चालले आहे हे महाराष्ट्रात? ज्यांना मतदान करायचे आहे त्यांचा तो अधिकार आहे. असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

भाजपाचा नोट जिहाद आहे का?
भाजपाने जे काही चालवले आहे ते नोट जिहाद आहे की दारू जिहाद आहे असाही सवाल नाना पटोलेंनी विचारला आहे. एवढेच नाही तर महाविकास आघाडीचे सरकार येईल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांचा एक व्हीडीओ व्हायरल झाला होता. विनोद तावडे हे कथितरीत्या पैसे वाटप करत असल्याचा आरोप बविआचे हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी केला होता. तसेच विरोधकांनीही याबाबत भाजपावर बरीच टीका केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR