राज्यात साथीच्या आजाराचे थैमान; १२ हजारांहून अधिक मलेरियाची रुग्ण

मुंबई : प्रतिनिधी
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव कायम असून, यंदा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. २१ ऑगस्टअखेर राज्यात मलेरियाचे १२ हजार २१९, डेंग्यूचे ६ हजार ३७९ आणि चिकुनगुनियाचे १ हजार ९३ रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मुंबई आघाडीवर आहे.

सध्या पावसाळा सुरू असून विविध साथीच्या रोगांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. डासांची उत्पत्ती वाढली असून डेंग्यू, मलेरियासारखे आजार बळावले आहेत. सध्या मलेरिया आजारांमध्ये वाढ होत आहे. २०२५ मध्ये २१ ऑगस्टअखेर राज्यात मलेरियाचे १३ हजार ६५८ रुग्ण आढळले होते. यंदा ही संख्या १२ हजार २१९ वर आली आहे. मलेरियामुळे यंदा दोन मृत्यू झाले असून, एकूण रुग्णांपैकी ४ हजार ३९३ रुग्ण पी.एफ. प्रकारातील आहेत.

मात्र, डेंग्यूच्या बाबतीत परिस्थिती उलट आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ४ हजार ३४४ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली होती. यंदा हा आकडा ६ हजार ३७९ वर पोहोचला आहे. डेंग्यूमुळे यंदा तीन मृत्यू झाले आहेत. चिकुनगुनियाचे १ हजार ९३ रुग्ण आढळले असून, या आजारामुळे अद्याप एकही मृत्यू झालेला नाही.

मलेरियात मुंबई आघाडीवर
जिल्हानिहाय आकडेवारीत गडचिरोलीत मलेरियाचे सर्वाधिक ३ हजार ४२६ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २ हजार ७५४ रुग्ण पी.एफ. प्रकारातील आहेत. गडचिरोलीत मलेरियामुळे दोन मृत्यू झाले आहेत. त्यानंतर रायगडमध्ये ३४१, गोंदियात १२६ आणि चंद्रपूरमध्ये ९२ रुग्ण आढळले.
महापालिका क्षेत्रांचा विचार करता मुंबईत मलेरियाचे तब्बल ६ हजार ३३९ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १ हजार २०० रुग्ण पी.एफ. प्रकारातील आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात ५०२, पनवेलमध्ये ३९४, तर मीरा-भाईंदरमध्ये १०० मलेरिया रुग्णांची नोंद झाली आहे.

डेंग्यूमध्येही मुंबई पुढे
डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही मुंबईचा आकडा सर्वाधिक आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात १ हजार ८१० डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात १ हजार १४०, तर ठाणे महापालिका क्षेत्रात ४५० रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यांमध्ये पालघरमध्ये २४०, पुण्यात १९३, धुळ्यात १४८ आणि लातूरमध्ये १२६ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील डेंग्यू नियंत्रणासाठी मुंबईसह पालघर, पुणे या भागांवरही आरोग्य विभागाचे विशेष लक्ष आहे.

चिकुनगुनियात पालघर आघाडीवर
चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत पालघर २६४ रुग्णांसह आघाडीवर आहे. पुणे जिल्ह्यात १३८, लातूरमध्ये ५६ आणि धुळ्यात ५५ रुग्ण आढळले आहेत. महापालिका क्षेत्रात पुण्यात ७१, मुंबईत ६१, अकोल्यात ४१ आणि कोल्हापुरात ३४ रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईत रुग्णसंख्या वाढण्याचा धोका
मुंबईत मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने शहर कीटकजन्य आजारांचे प्रमुख हॉटस्पॉट ठरले आहे. पावसाळा आणखी काही काळ कायम राहणार असल्याने डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करणे आणि तापाच्या रुग्णांची वेळीच तपासणी करणे महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा रुग्णसंख्या पुढील काळात वाढण्याचा धोका आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27
Video thumbnail
Latur|‘तुम से ना हो पायेगा’! अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; लातूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
07:57
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक संतप्त; हदगावमध्ये बॅनर फाडले
00:33
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर आंदोलनाची धार वाढली? बरडशेवाळ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको
00:33
Video thumbnail
Nanded|उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला! पावसाअभावी नांदेडच्या शेतकऱ्याची हतबलता
02:06
Video thumbnail
Nanded|मराठवाड्याचा मुक्ती संग्राम पाठ्यपुस्तकात घ्या! नांदेडमधून शासनाकडे मोठी मागणी
03:26
Video thumbnail
Latur|हातातोंडाशी आलेला घास गेला! लातूरमध्ये पाण्याअभावी उभी पिकं करपली
03:42
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
07:57
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
10:46
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:02
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
16:29

Latest news