राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार;सहकारीमंत्र्यांची माहिती

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. राज्यातील अनेक भागांत खरीप पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पावसाअभावी सोयाबीन, कापूस वाळले असून उसाचेही मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत प्रशासनाने राज्यात दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ लागू केला आहे. तसेच विरोधकांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असतानाच सरकारने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना दुष्काळग्रस्त भागांत प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. तीव्र टंचाईचा सामना करण्यासाठी महसूल, कृषी आणि जलसंपदा विभागाच्या माध्यमातून तातडीने उपाययोजना राबवण्याची चाचपणी राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही दुष्काळाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवार २८ सप्टेंबर रोजी दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.

दुष्काळ १०० टक्के जाहीर होणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील
राज्य सरकारमधील सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी परिस्थितीबाबत बोलताना सांगितले, एवढा दुष्काळ मी माझ्या आयुष्यात कधी बघितलेला नाही. कुठलीच पीके आलेली नाहीत. सोयाबीन, कापूस गेला उसाचे नुकसान झालं. दुष्काळ तर जाहीर होणारच आहे. एनडीआरएफच्या नियमांप्रमाणे शासन मदत करणारच आहे. दुष्काळ १०० टक्के जाहीर होणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41

Latest news