मुंबई : प्रतिनिधी
भायखळा येथे असलेले वीरमाता जिजाबाई भोसले पार्क आणि प्राणीसंग्रहालय (राणी बाग) हे मुंबई आणि परदेशातील पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण बनत आहे. गेल्या दोन वर्षांत, ७१.८ लाख पर्यटकांनी बिबट्या, बंगाल वाघ, मगर आणि अस्वल यांसारख्या देशी आणि विदेशी प्राणी व पक्षी पाहण्याचा थरार अनुभवला आहे.
जपानी क्रौंच आणि आफ्रिकन ग्रे पोपटांच्या किलबिलाटाने देशी आणि विदेशी पर्यटकांना राणीबागेकडे आकर्षित केले आहे. मुंबई महापालिकेने पर्यटकांकडून २८.१ कोटी रुपये महसूल मिळवला आहे. भारत आणि परदेशातील कुटुंबे, मुले आणि पर्यटक दररोज राणीबागेला भेट देत असतात.
शनिवार, रविवार आणि सुट्टयांच्या दिवशी पार्क आणि प्राणीसंग्रहालयात मोठी वर्दळ असते. आधुनिकीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. राणीबागेमध्ये एक नवीन गुलाब उद्यान आणि जपानी उद्यान तयार करण्यात आले आहे.
मुलांच्या मनोरंजनासाठी खेळणी, स्थानिक सालिंदर हे प्रमुख घटक पर्यटकांचे आकर्षण बनत आहेत. यापैकी आठ पेंग्विन २०१६ मध्ये विदेशी पक्षी, वाघ, बिबटे आणि आणण्यात आले होते. आता पेंग्विनची संख्या २१ झाली असून, पर्यटक पेंग्विनचा आनंद घेण्यासाठी येत आहेत.ज्यामुळे उत्पन्नात लक्षणीय वाढ होत आहे, असे जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.राणीबागेचे प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती रु. ५० आहे, तर ३ ते १५ वयोगटातील मुलांसाठी रु. २५ आहे. पालक आणि १५ वर्षांपर्यंतची दोन मुले अशा चार जणांच्या कुटुंबासाठी एकत्रित प्रवेश शुल्क रु. १०० आहे.

