23.4 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeपरभणीरामबाग गणेश मंडळ ६५ वर्षांची जिवंत देखाव्याची परंपरा आजही कायम

रामबाग गणेश मंडळ ६५ वर्षांची जिवंत देखाव्याची परंपरा आजही कायम

सेलू : येथील मारवाडी गल्ली भागातील पुर्वीचे रामवाडा व सध्याचे रामबाग गणेश मंडळ यांनी आपली धार्मिक व आध्यात्मिक जिवंत देखावे सादर करण्याची ६५ वर्षांपूर्वीची परंपरा आजही कायम ठेवली आहे. त्यांनी सादर केलेले देखावे पाहण्याकरिता नागरिकांची गर्दी होत आहे.

पूर्वी गणेशोत्सवाच्या कालावधीत राम वाडा, नवाडे गल्ली भागातील गणेश मंडळासह काही बोटावर मोजण्याएवढ्या गणेश मंडळांनी सेलूमध्ये गणेशोत्सवाच्या कालावधीत जनजागृती करण्याच्या उद्देशाने अध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रम, विविध स्पर्धा तसेच ऑर्केस्ट्रा सारखे सांगीतिक कार्यक्रमाची रेलचेल असायची. मात्र गेल्या काही वर्षापासून गणेशोत्सवाच्या काळात या सर्वच कार्यक्रमांना ब्रेक लागला आहे.

याला कुठेतरी छेद देत आजच्या रामबाग गणेश मंडळाने आपली परंपरा कायम ठेवली आहे. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवात रामबाग गणेश मंडळाने सादर केलेला गणपती व कार्तिकेयनचा पृथ्वी प्रदक्षिणेचा जिवंत देखावा पाहण्याकरिता महिला, नागरिक व बच्चे कंपनी मोठी गर्दी करत आहेत. तर ८ फूट उंच व १२ फूट लांबीचा पिसारा फुलवून प्रसाद देणारा मोर देखील गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.

देखाव्याची ही परंपरा अशीच पुढेही चालत राहावी याकरिता रामबाग गणेश मंडळाचे पदाधिकारी अथवा मित्र मंडळाचे गौरव बिहानी, गौरव तिवारी, सागर लोया, विशाल सोमानी, श्रेयस परतानी, श्रवण काबरा, रजत मंत्री, चेतन लोया, अमित भरलोटा, सचिन भेंडे, सर्वेश काबरा, राणा तिवाडी, गोविंद तिवारी आदी कार्यरत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR