राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय, मिश्रांचा राजीनामा

राम मंदिरातील देणगीवर डल्ला, ८ जणांना बेड्या,
राय मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस, डॉ. अनिल मिश्रा विश्वस्त

अयोध्या : वृत्तसंस्था
अयोध्येतील राम मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या देणगीवर डल्ला मारल्या प्रकरणी ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. चंपत राय यांच्यासोबत विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, विश्वस्त नृपेंद्र मिश्रा यांनी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्याबाबत आपल्याला माहिती मिळाल्याचे सांगितले.

अयोध्येतील राम मंदिरातील देणगीवर डल्ला मारल्या प्रकरणी एफआयआर दाखल केल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा चंपत राय यांचे निकटवर्तीय रामशंकर यादव (उर्फ टिन्नू) सह ८ जणांना अटक केली. त्यामध्ये अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष कुमार यादव, करुणेश पांडे, रामाशंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव, राम शंकर यादव उर्फ टिन्नू यादव यांचा समावेश आहे. पोलिसांनी आज सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणी ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून गुरुवारी सायंकाळी पहिला एफआयआर दाखल केला होता. मात्र, या एफआयआरमध्ये चंपत राय आणि डॉ. अनिल मिश्रा यांच्यासारख्या वरिष्ठ पदाधिका-यांची नावे नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्य आरोपी अनुकल्प मिश्राच्या मदतीने त्याचा मेहुणा लवकुश मिश्रा याने हा घोटाळा केला. पोलिसांनी लवकुशच्या घरातून सुमारे १० लाख रुपयांची रोकड जप्त केली तर दुसरा आरोपी अविनाश पांडेच्या वैयक्तिक बँक खात्यात चोरीचे पैसे जमा झाल्याचे उघड झाले. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या चोरीची घटना सर्वप्रथम ७ जून रोजी उघडकीस आली. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारने १३ जून रोजी विशेष तपास पथक स्थापन केली. त्यावर एसआयटीने २३ जून रोजी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय प्रसाद यांना आपला प्राथमिक अहवाल सादर केला. या प्रकरणी ८ आरोपींना अटक करून आज न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. सर्व आरोपींकडून एकूण ७९,८५,४९३ रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणात सरकारी कर्मचारी सामील आहेत. एसबीआयचे सुमारे पाच ते सहा कर्मचारी आरोपी आहेत.

दरम्यान, ठाकरे सेनेचे खा. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरासाठी १ कोटी रुपये आणि ४ किलो वजनाची चांदीची वीट देणगी म्हणून दिली होती. इतकी वर्षे उलटूनही ट्रस्टकडून त्याची कोणतीही पावती मिळाली नाही. ती वीट कुठे गेली, आता जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे, असे म्हटले. यावरूनही आता संशय बळावला आहे. त्यातच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी राम लल्लाचे दर्शन घेतले. ते म्हणाले, ज्यांनी हे महापाप केले, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. एफआयआर केवळ एक दिखावा आहे. या प्रकरणी प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

चंपत राय, मिश्रा
यांच्यावर गुन्हा नाही?
एसआयटीने आपल्या तपास अहवालात चंपत राय, विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा आणि बांधकाम प्रभारी गोपाल राव यांच्यासह १७ जणांचे आरोपी म्हणून नाव दिले होते. त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल होणे जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र, एफआयआरमध्ये चंपत राय आणि मिश्रा यांची नावे नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|MPSC ऑनलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार
00:30
Video thumbnail
Ramdas Athawale ON Sharad Pawar|शरद पवारांनी NDA मध्ये यावे, स्वागतच करू" – आठवले
11:50
Video thumbnail
Latur|द्रोणा डिफेन्स अकॅडमीविरोधात मनसेचे आंदोलन
03:19
Video thumbnail
Latur Doctar Suicide|डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!
02:49
Video thumbnail
Latur|पिस्तुल्या महाराजाचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला!
02:05
Video thumbnail
Nanded|पाण्यासाठी महिलांचा एल्गार; घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक!
00:32
Video thumbnail
Nanded|महिलांची ताकद! वझरा गावात दारूबंदीचा ठराव मंजूर
00:25
Video thumbnail
Nanded|₹1.30 कोटींचा बंधारा... पण लाथ मारताच कोसळला?
02:50
Video thumbnail
Latur|सावकाराने जमीन हडपल्याचा आरोप; शेतकऱ्याचे आमरण उपोषण
04:42
Video thumbnail
Latur|गटप्रवर्तक महिलांचे आशाताई भिसे यांना साकडे
06:36
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16

Latest news