30.4 C
Latur
Friday, February 13, 2026
Homeराष्ट्रीयराष्ट्रपती मुर्मू यांनी अर्थमंत्र्यांना दही-साखर खाऊ घालत दिल्या शुभेच्छा

राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्थमंत्र्यांना दही-साखर खाऊ घालत दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असतील किंवा अर्थमंत्री निर्मला सीतारामन, दोघीही भारतीय संस्कृती, परंपरा जपणा-या उच्चपदस्थ महिला आहेत, हे विशेष. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींच्या भेटीसाठी सीतारामन गेल्या असता राष्ट्रपतींनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दही-साखर खाऊ घालत त्यांना आणि त्यांच्या टीमला अर्थसंकल्प सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रपती भवन कार्यालयाने ट्विटरवर पोस्ट केली आहे त्यात लिहिले की, केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमन, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिका-यांसह, केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यानंतर सीतारामन टॅबलेट घेऊन संसद भवनात पोहोचल्या.

अर्थसंकल्पापूर्वी डिफेंस स्टॉक्स तेजीत
या अर्थसंकल्पामुळे संरक्षण क्षेत्रात मोठी संधी निर्माण होऊ शकते. याचा अंदाज घेऊन, आज सकाळी संरक्षण शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. सकाळी १०:१५ वाजेपर्यंत भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सचे शेअर्स २ टक्क्यांहून अधिक वाढले होते. पारस डिफेन्सचे शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक वाढले. सुरुवातीच्या व्यवहारात डेटा पॅटर्नचे शेअर्स ४ टक्क्यांहून अधिक वाढले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR