23.5 C
Latur
Thursday, January 15, 2026
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादीचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
निवडणुकीच्या धामधुमीत छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठे आक्रीत घडले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रभाग क्रमांक १६ मधील कैलासनगरमधील कार्यालय अज्ञात व्यक्तीकडून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार येथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

राष्ट्रवादीकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांत तक्रार देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी दिली आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून असे प्रकार घडत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.

७ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजेदरम्यान हा प्रकार घडला. एक लाल टी शर्ट घातलेला इसम या ठिकाणी आला. त्याने कार्यालयाबाहेरील पडद्याला आग लावली. त्यानंतर त्याने सिगारेट शिलगावत आरामात तिथून पळ काढला. दरम्यान या ठिकाणी आग लागली होती. परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांनी कार्यकर्त्यांना उठवले आणि आग लागल्याची माहिती दिली. जातीपातीच्या राजकारणाला आम्ही थारा देत नाही. विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही निवडणूक लढवत आहोत. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही उपलब्ध करून देत पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवल्याचे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR