23.8 C
Latur
Wednesday, March 11, 2026
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकरांच्या पुत्रावर बिबट्याचा हल्ला

राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकरांच्या पुत्रावर बिबट्याचा हल्ला

कराड : कराड तालुक्यातील काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचा नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा चिरंजीव अधिराज पाटील यांच्यावर शुक्रवारी रात्री बिबट्याने हल्ला केला. उंडाळे भागातील शेवाळेवाडी विभागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन घराकडे परत येत असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यात अधिराज यांना दुखापत झाली असून ते जखमी झाले आहेत.

कराड तालुक्यातील येळगाव जिल्हा परिषद गटातून उदयसिंह पाटील-उंडाळकर हे निवडणूक लढवत आहेत. शुक्रवारी रात्री या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिराज शेवाळेवाडी विभागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी गेले होते. तेथून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून ते परत येत होते. धनाजी पाटील हे त्यांच्यासोबत होते.

उंडाळे ते शेवाळेवाडी जाणा-या रस्त्यावर अचानक बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झेप घेत अधिराज पाटील यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये अधिराज यांच्या पायाला जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर धनाजी पाटील व अधिराज पाटील हे तातडीने उंडाळ्यात आले. त्यांना उपचारासाठी उंडाळेच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR