परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी संबोधी अकादमीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिमराव हत्तीअंबीरे यांची दि.३ रोजी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मुंबईतील राष्ट्रवादी भवनात हत्तीअंबीरे यांना प्रदेश उपाध्यक्ष पदाच्या नियुक्तीचे पत्र बहाल केले. त्याद्वारे पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करुन पक्ष मजबुत करण्यासाठी आपण सर्वशक्तीनिशी योगदान द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे, शेषराव जल्हारे, सिध्दार्थ भराडे आदी उपस्थित होते.