राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचे कार्यालय पेटवले

बीड : प्रतिनिधी
बीडच्या नगरसेविकेच्या पतीने बीएलओ म्हणून काम करणा-या एका शिक्षकाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका राजकीय नेत्याचे कार्यालय पेटवल्याची घटना उघडकीस आली आहे. कार्यालयाला पेटवण्याची घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. जुन्या वादातून नेत्याचे कार्यालय पेटवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. आता या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या वडवणीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय जमाले यांचे जनसंपर्क कार्यालय पेटवल्याची माहिती हाती आली आहे. एकाने जुन्या वादातून कार्यालय पेटवल्याचा आरोप जमाले यांनी केला आहे. कार्यालयात ज्वलनशील पदार्थ फेकून आग लावून आरोपी पळाल्याचे समोर आले आहे. या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. या आगीत महत्त्वाची कागदपत्रे, कॉम्प्युटर, प्रिंटर आणि फर्निचर जळून खाक झाले आहे.

जमाले यांच्या तक्रारीवरून मोहनसिंग टाक याच्याविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. दत्तात्रय जमाले यांचे कार्यालय पेटवल्याच्या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जमाले यांच्या समर्थकांनी कडक कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी देखील गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. आता या प्रकरणी पोलिसांकडून काय कारवाई केली जाईल, हे पाहावे लागेल.

नगरसेविकेच्या पतीकडून बीएलओला मारहाण
काही दिवसांपूर्वी बीडमध्ये बीएलओ म्हणून काम करणा-या शिक्षकाला मारहाण झाल्याची घटना घडली. ही मारहाण एका नगरसेविकेच्या पतीने केल्याची माहिती मिळत आहे. शिक्षकाला मतदान नोंदणीचा फॉर्म भरून देण्याच्या वादातून मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02

Latest news