23.9 C
Latur
Monday, September 9, 2024
Homeनांदेडराहुल गांधींकडून दिवंगत खासदार चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन

राहुल गांधींकडून दिवंगत खासदार चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन

काँग्रेस अध्यक्ष खरगे, चेन्नीथला, आ. पटोले व आ. देशमुखांनीही केले सांत्वन

नांदेड : प्रतिनिधी
लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या नायगाव येथील निवासस्थानी भेट देऊन चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले. याचवेळी काँगे्रसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख यांनीही चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले.

नांदेड लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने काँगे्रसचे दि. खासदार वसंतराव चव्हाण यांनी भाजप उमेदवार तथा माजी खासदारांचा पराभव केला होता. दि. १३ ऑगस्ट रोजी अचानक प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी त्यांना नांदेड येथून हैदराबाद येथे हलविण्यात आले. हैदराबाद येथील रुग्णालयात १४ दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. अखेर २६ ऑगस्ट रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी दुपारी नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या नायगाव येथील निवासस्थानी भेट देऊन चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले. कुटुंबियांशी खा. गांधी आणि खा. खरगे यांनी चर्चाही केली. याचवेळी काँगे्रसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री आ. अमितभैय्या विलासराव देशमुख यांच्यासह अन्य नेत्यांनी चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले. दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला काँग्रेस नेत्यांनी पुष्प अर्पण केले. यावेळी खा. राहुल गांधी यांनी चव्हाण कुटुंबांशी संवाद साधला. त्यानंतर राहुल गांधी, खरगे आणि इतर नेते सांगली येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR