लातूर : प्रतिनिधी
एलआयसी कॉलनी येथील रुद्रेश्वर मंदिराच्या प्रांगणात श्रावण मासाचे औचित्य साधत सोमवारी सतरा फुटी महादेव मूर्तीची भक्तीमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर हे होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय सरसंघचालक संजय अग्रवाल, शहर संघचालक उमाकांत मद्रेवार, माजी महापौर सुरेश पवार, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, काँग्रेसचे प्रभाग अठराचे अध्यक्ष सुंदर पाटील कव्हेकर, श्याम बलवतकर, महेश पाटील, गणेश कोलपाक, शोभा पाटील, श्वेता लोंढे, स्वाती घोरपडे, व्यंकटेश कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मूर्तीकार अजय मुंदडा यांचा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संजय अग्रवाल, सुरेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप माधवराव पाटील टाकळीकर यांनी केला. प्रास्ताविक चंद्रकांत बिराजदार यांनी केले. सूत्रसंचालन भालचंद्र येडवे पाटील यांनी केले. आभार शिवशंकर मळभागे व बनसोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय एकशेट्टे, संजय धुम्मा, प्रदीप पाटील, शिवशंकर स्वामी, महादेवी बिराजदार, महेश करवंदे, मन्मथ बोळेगावे, शिवकुमार बिरादार, विनायक माने, अशोक घुमरे, राजू बिराजदार, आदींनी परिश्रम घेतले. सोहळ्यास रुद्र प्रतिष्ठानचे पदाधिकारी व परिसरातील भाविक भक्तांसह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

