रेणापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील दिलीप नगर निवडा येथील रेणा सहकारी साखर कारखाना यावर्षीचा २०२५-२६ च्या गळीत हंगामात कारखान्याने ८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली
दिलीप नगर निवाडा येथील रेणा सहकारी साखर कारखान्याचे हंगाम २०२५ -२६ चे मिल रोलर पुजन कारखान्याचे संस्थापक सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी दि २० जून रोजी झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी गतवर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याने येणा-या गळीत हंगामात ८ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे कारखान्याने उद्दीष्ट ठेवले आहे . त्यादृष्टीने कारखान्याने हंगाम पूर्व कामे हाती घेतली असून मशिनरी दुरुस्ती, साफसफाई इत्यादी कामे वेळेत पूर्ण करण्याची तयारी करण्यात येत असल्याचे सांगितले .
यावेळी रेणा साखर कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकुर, व्हाईस चेअरमन अॅड प्रविण पाटील, संचालक आबासाहेब पाटील, विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोकराव काळे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती शेषेराव हाके, धनराज देशमुख तुकाराम कोल्हे, संग्राम माटेकर, चंद्रकांत सुर्यवंशी, संभाजी रेडडी, शंकरराव पाटील, सतिश पवार, गोविंद पाटील रणजित पाटील, तानाजी कांबळे, बालाजी हाके, वैशालीताई माने, आमृताताई देशमुख, पंडीतराव माने, स्रेहलराव देशमुख माजी तज्ञ संचालक लालासाहेब चव्हाण, कार्यकारी संचालक बी.व्ही. मोरे, इंदिरा सूतगिरणीचे चेअरमन बाळासाहेब कदम, रेणापूर बाजार समितीचे संचालक प्रकाश सुर्यवंशी जाधव, माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी, लातूर बाजार समितीचे संचालक डॉ बालाजी वाघमारे यांच्यासह विविध खाते प्रमुख, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.