Homeलातूररेणापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात

रेणापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात

रेणापूर : प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  १३५ वी जयंती मंगळवारी उत्साहात साजरी करण्यात आली त्यानिमित रेणापूर येथील बाजार मैदानात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नगराध्यक्षा शोभाताई शामराव आकनगिरे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन धूप, दीप व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी दादाराव कांबळे हे होते. मंचावर माजी प्रथम नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अभिषेक आकनगिरे, भाजप नेते श्रीकृष्ण मोटेगावकर, येथील ग्रामिण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ. अनिता अलगुले, पं. स. उपसभापती शरद दरेकर, मारूफ आतार, अमोल कदम, प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे, अनिल कुटवाड, प्राचार्य बाबासाहेब बरिदे, प्राचार्य शेख सलाउद्दीन, मुख्याध्यापक अंतेश्वर कपाळे, पत्रकार रफिक शेख-शिकलकर, विजय मोटेगावकर, सात्तप्पा खोबरे, प्रा. सतीश उगिले, शफीभाई शेख, ज्ञानोबा पुजारी, मोहसीन शेख, महेश गाडे, अमृतेश्वर स्वामी, राठोड सर आदींची उपस्थिती होती.
मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. पूर्वी घोडके हिने बुद्ध वंदना, धम्म वंदना व संघ वंदना सादर केली. त्यानंतर सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शहरातील श्रीराम विद्यालय, छत्रपती शिवाजी विद्यालय, मोहम्मद उर्दू स्कूल, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, उपचंद पोस्ट बेसिक आश्रम शाळा, जिल्हा परिषद प्रशाला व रेणुका पब्लिक स्कूल येथील होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला. तसेच समाजभूषण पुरस्कार प्राप्त संजयजी वेरूळे, इलेक्ट्रिशियन क्षेत्रात देशात द्वितीय क्रमांक मिळवणारे शेख रिजवान शहेनशहा आणि लातूर पोलीस दलात नुकतेच भरती झालेले रोहित चक्रे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर भाष्य केले. अभिषेक  आकनगिरे व प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे यांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा देत आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन उमाकांत कांबळे व ऍड. अविनाश चक्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शरद चक्रे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सार्वजनिक जयंती समितीचे धम्मानंद घोडके, अजयकुमार चक्रे, शरद चक्रे, नानाभाऊ चक्रे, उमाकांत कांबळे, ऍड. अविनाश चक्रे, रंगनाथ चक्रे, प्रकाश घोडके, शंकर चक्रे, काशिनाथ चक्रे, संतोष घोडके, देविदास गायकवाड, बळीराम उफाडे, अतुल चक्रे, भगवान चक्रे, विनोद कांबळे, पप्पू घोडके, नागनाथ घोडके, नानासाहेब चक्रे, नारायण चव्हाण, अविनाश घोडके, भैय्यासाहेब चक्रे, दीपक कांबळे, श्रीहरी गायकवाड, सुरेश कांबळे, बप्पा आवळे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR