16.8 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeलातूररेणापुरात निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध

रेणापुरात निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध

रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर नगर पंचायत निवडणुकीच्या मतदानास अवघे दोन दिवस राहिले असताना निवडणूक प्रक्रियेस अचानक स्थगिती देण्याचा निर्णय घेतला तो अनाकलनीय व धक्कादायक आहे. राज्य निवडणूक आयोगाची ही कृती जनतेच्या मतदान अधिकारावर गदा आणणारी असून ती लोकशाही विरोधी आहे असल्याचे मत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व इतर विरोधी पक्षांनी व्यक्त करून बुधवारी सकाळी १० ते सांयकाळी २ वाजेपर्यंत रेणापूरची बाजारपेठ बंद ठेवून आयोगाच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.

या बंदला व्यापारी व सर्वच व्यावसायीकांनी आपले सर्वच व्यवहार बंद ठेवून उत्स्फुर्तपणे शंभर टक्के प्रतिसाद दिला. त्यामुळे बुधवारी रेणापूर व पिंपळकाटा येथील सर्व हॉटेल, किराणा दुकान, धाबे, पानटप-या व इतर सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष रेणापूर शहरच्यावतीने बुधवारी (दि.३ ) कडकडीत बंद पाळण्यात आला.

यावेळी रेणापूर तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोद कापसे, रेणापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी (पदम) पाटील, पंडित माने, सेवादलचे हनुमंत पवार, प्रदिप (राजाभाऊ) माने, कमलाकर आकनागिरे, भूषण पानुरे, रोहित गिरी, केशव माने, गजेंद्र चव्हाण, विलास राठोड, प्रदीप काळे, पंडित कातळे, सचिन इगे, सचिन मोटेगावकर, रहीम पठाण, अ‍ॅड. महेश राजे, पंडित कातळे, जनार्दन माने, गणेश कलाल, अनिल पवार, अजय चक्रे, रामलिंग जोगदंड, नितीन मोटेगावकर, नागेश राजे, संतोष शिंदे, अतुल कातळे यांच्यासह कार्यकर्तेे, पदाधिकारी , व्यापा-यांचा हा बंद यशस्वी करण्यामध्ये सहभाग होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष बालाजी कदम व त्यांच्या असंख्य सहका-यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा निषेध करून रेणापूर शहराच्या बंदमध्ये सहभाग घेतला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR