रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रेणापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता बैठकीस प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक झाली. रेणापुर नगरपंचायत निवडणुक जिंकुन वार्डांचा विकास साधण्याचा निर्धार उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंखे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, रेणा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रविण पाटील, रेणापूर कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, कृउबाचे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती अॅड. शेषेराव हाके, संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सचिन पाटील, माजी सभापती दिलीपराव पाटील, रेणा साखर कारखान्याचे संचालक तुकाराम कोल्हे, चंद्रचूड चव्हाण, गोविंद पाटील, बालाजी हाके, रेणापूर शहर काँग्रेस अध्यक्ष पद्मसिंह पाटील, सतीश पाटील, पंडित माने, सुरेश लहाने, अशोक पाटील, दिलीप गोटके, प्रदिप राठोड, गजेंद्र चव्हाण आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते धिरज देशमुख म्हणाले, काँग्रेस पक्षाला जनसेवेची उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होवून काँग्रेस जणांनी देशाच्या विकासाचा पाया रचला. जनतेने नेहमीच काँग्रेस विचाराला साथ दिली आहे. नागरी समस्यांसाठी काम करत असताना होवू घातलेल्या रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी आम्ही सारे प्रयत्नशील आहोत, अशी भावना व्यक्त केली.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंखे म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक दिलाने रेणापूर नगर पंचायत निवडणूकीस सामोरे जावे. आपसातील मतभेद बाजूला सारून नगरपंचायती अंतर्गत येणा-या विविध वार्डांचा विकास करून लोकांना त्यांच्या हक्काचे लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. होवू घातलेली रेणापूर नगरपंचायत निवडणूक आम्ही पुर्ण ताकदीने लढवणार असून काँग्रेस विचाराचा अध्यक्ष व सदस्य निवडून आणण्यासाठी ठाम निर्धार सर्वांनी यावेळी केला. या कायक्रमाचे सुत्रसंचलन रहिम पठाण यांनी तर मनोगत व आभार पद्मसिंह पाटील यांनी मानले. या संवाद बैठकीस रेणापूर शहरातील कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

