रेणापूर : प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी दि. ६ एप्रिल रेणापूर शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला रेणापूर तालुका, शहर काँग्रेस च्या वतीने रेणापूर येथील रेणुकादेवी मंदीरात महाआरती , ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप, आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, सायगाव येथील दर्ग्याला चादर अर्पन, तसेच ५० टक्के सवलतीच्या दरात एलएडी टिव्ही, सायकल, वॉटर फिल्टर विक्री करण्यात आली .
यावेळी काँग्रेसचे रेणापूर तालुकाध्यक्ष प्रमोद कापसे, शहराध्यक्ष नितीन मोटेगावकर रेणाचे चेअरमन अनंतराव देशमुख, माजी चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, उमाकांत खलंग्रे, अॅड. शेषेराव हाके, माजी सभापती प्रदिप राठोड, धनराज देशमुख, विलास भोसले, नागनाथ कराड, हनमंत पवार, बाळकृष्ण माने, उद्धव जाधव, तात्याराव वाघमारे, अमर वाकडे, राजेसाहेब खाडप, अमरिश भिसे, पंडीत माने, प्रकाश सूर्यवंशी, प्रदिप माने, बाळकृष्ण माने, सचिन मोटेगावकर, बाळकृष्ण खटाळ, भूषण पनुरे , पदमसिंह पाटील, रहिम पठाण, केशव माने, शहाजी पवार, विश्वजीत पाटील, दिग्विजय पाटील, मारुती गायकवाड, महेश खाडप, राज खाडप, कल्याण शाहीर, प्रशांत माने, प्रशांत घोडके, बालासाहेब पवार, आकाश राठोड, विनोद खंदाडे, रोहित गिरी, कैलास जाधव, दिपक जगदाळे, गोविंद विर, बाळू टमके, अॅड. तानाजी कणसे, धनंजय माने, प्रदिप काळे अजय चक्रे, विश्वनाथ कागले, अॅड. प्रशांत अकनगिरे, संतोष शिंदे, चेतन एकुरके, सुरज वंगाटे, अतुल कातळे, किशोर चक्रे, शिवाजी अकनगिरे उपस्थित होते.
खरोळ्यातील दत्त मंदिर येथे आरती
खरोळा येथील सरपंच धनंजय देशमुख यांच्या वतीने दत्त मंदिर येथे आरती करण्यात आली . यावेळी विश्वासराव देशमुख, शिवराज सप्ताळ, सरपंच धनंजय देशमुख, विलास भोसले , विश्वानाथ कागले, प्रशांत भरबडे, अनिल गिरी, जगन्नाथ धबडगे, जगन्नाथ रवळे, संजय राऊतराव सुदाम भोसले, धनराज देशमुख, केदारनाथ सप्ताळ, प्रवीण गौंड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कारेपूर येथे शैक्षणिक साहित्यांचे वाटप
कारेपूर येथील सरपंच तथा कृउबाचे संचालक प्रविण माने यांच्या वतीने कारेपूर येथील आदर्श विद्यालय , स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद शाळा गोपाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच प्रवीण माने, काँग्रेस विधी विभाग तालुकाध्यक्ष अॅड. तानाजी कनसे, तालुका सरचिटणीस धनंजय माने, अॅड. धनंजय कापसे, उपसरपंच संभाजी माने, दत्ता माने, मुबारक शेख , माधव साळवे, अशिकेश माने, अलिम शेख, परमेश्वर माने, विलास कदम आदी उपस्थित होते.

