18.2 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeसोलापूररेल्वेच्या ब्लॉकमुळे प्रवाशांची एस.टी.ला गर्दी

रेल्वेच्या ब्लॉकमुळे प्रवाशांची एस.टी.ला गर्दी

सोलापुर : रेल्वेच्या ब्लॉकमुळे सोलापुरातून पुणे, मुंबईला जाणाऱ्या रेल्वे रद्द इाल्या. परिणामी, ही सर्व गर्दी गत दोन दिवसांपासून एस.टी. कडे वळाल्यामुळे सोलापूर बसस्थानकावर पुणे, मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एम.टी. प्रशासनाकडून जादा बस सोडण्यात आल्या, मात्र प्रवासी संख्येच्या तुलनेत बस कमी असल्यामुळे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

दरम्यान, दौंड रेल्वेस्थानक, दीड कॉर्डलाईन या ठिकाणी नॉन इंटरलॉकिंगचे काम एक ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यात पुणे-सोलापूर-पुणे इंद्रायणी, शताब्दी, हुतात्मा एक्स्प्रेस यासह अन्य डेमू मेल एक्स्प्रेस रद्द केल्यामुळे रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची गर्दी एस.टी. स्थानकावर आली आहे. रेल्वे प्रशासनाने ब्लॉकमुळे रेल्वे रद्द केल्या आहेत. सोलापूर विभागाने सोलापूर, अक्कलकोट,आदी आगारांतून पुणे, मुंबईला जाण्यासाठी जादा बस सोडल्या आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकाकील सर्व गर्दी दोन दिवसांपासून बसस्थानकावर पाहायला मिळत आहे.

सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दुपारनंतर पुण्यातून येणाच्या गाड्यांना उशीर होत असल्याने सोलापुरातून पुण्याला जाणाऱ्या गाड्यांना उशीर होऊ लागला आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. प्रवाशांच्या तुलनेत बसची संख्या कमी असल्यामुळे आणि पुण्यावरून बस सोलापूरला उशिरा येत असल्याने प्रवाशांना तासन्‌तास बसस्थानकावर पंढरपूर, बार्शी ताटकळत थांबावे लागत आहे.

सोलापूर बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढत आहे. बस आल्यानंतर प्रवाशांची झुंबड उडत आहे. या धावपळीत लहान मुले, महिला, वृद्धांचे हाल होत आहेत. यासाठी एस.टी. प्रशासनाने वाहतूक नियंत्रक यासह एस.टी.चे अधिकारी, कर्मचारी
बसस्थानकामध्ये प्रवाशांना रांगा लावण्यास भाग पाडत आहेत. यामुळे संभाव्य होणारी प्रवाशांची चेंगराचेंगरी टळत आहे.

सोलापूर-पुणे महामार्गावर वाहनांची गर्दी वाढली असून बहुतांश व्यक्तींनी खासगी वाहने बाहेर काढली. तसेच सोलापूरहून पुण्याला जाणार्‍यांची गर्दी अधिक असल्यामुळे सोलापूर-पुणे महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यामुळे दुपारनंतर बहुतांश गाड्यांना पुण्यात जाण्यास उशीर होत आहे. आधीच पाऊस त्यात बस नसल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करत पुणे गाठावे लागत आहे.

ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सोडल्या जादा गाड्या बसस्थानकावर गर्दी, त्यात बस उशिरा येऊ लागल्यामुळे अनेकजणखासगी वाहनांचा आधार घेत पुणे, मुंबई गाठू लागले आहेत. यात काही टुरिस्ट वाहनांसह खासगी कारचालकांची चांदी होत आहे. तसेच खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनीदेखील जादा बस सोडल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR