रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार

जळकोट : (ओमकार सोनटक्के)
मराठवाड्यातील अतिशय महत्त्वाचा असलेला लातूर रोड – जळकोट- मुखेड- बोधन हा रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे दिसून येत आहे , कारण ही तसेच आहे लातूर रोड ते बोधन या दरम्यान असलेला रेल्वेचा मार्ग भारतीय रेल्वेच्या नकाशावर झळकलेला आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया केव्हाही सुरू होऊ शकते अशी चर्चा आता सुरू आहे .

महाराष्ट्र ते तेलंगाना पुढे आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणमपर्यंत जोडणारा हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा रेल्वे मार्ग आहे. या रेल्वे मार्गाला सन २०१६ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजुरी दिली होती. त्यावेळी या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी १९ लाख रुपयाचा निधीही मंजूर करण्यात आला होता. यानंतर प्राथमिक सर्वेक्षण झाले मात्र पुढे या रेल्वेमार्गाची पुढील प्रक्रिया थांबली होती. यानंतर सातत्याने दैनिक एकमतने या रेल्वे मार्गाचा प्रश्न लावून धरला, यानंतर सन २०२३ मध्ये अंतिम रेल्वे मार्गस्थान सर्वेक्षण पूर्ण झाले. यामुळे हा रेल्वे मार्ग नक्कीच लवकरच पूर्ण होणार याची शक्यता निर्माण झाली. यानंतर या रेल्वेमार्गासाठी खडकाचे नमुनेही घेण्यात आले.

झारखंड येथील एका कंपनीकडून या रेल्वे मार्गासाठी खडकाचे नमुने घेण्यात आले. लातूर रोड ते बोधन तब्बल १३५ किलोमीटर लांबी दरम्यान हे खडकाचे नमुने घेण्यात आले. यानंतर या रेल्वे मार्गावर किती उड्डाणपूल उभा करायचे, किती नदीवर पूल उभा करायचे तसेच जिरायती जमीन किती व बागायती जमीन किती याची निश्चीत झालेली आहे. जवळपास या रेल्वेमार्गाचा आराखडा पूर्ण झालेला आहे. हा रेल्वे मार्ग कोणत्या गावावरून जाणार व कोणत्या जमिनीवरून जाणार याची देखील निश्चिती झाली आहे. गतवर्षीचे रेखांकन करण्यात आले आहे. हा रेल्वे मार्ग लातूर रोड इथून निघून कुमठा, जळकोट, लादगा, सावरगाव, मुखेड, नरसी, बिलोली, बोधन असा जाणार आहे.

आता या रेल्वे मार्ग उभारणीसाचा महत्वाचा टप्पा समजला जाणारा नकाशा आहे , या महत्वपूर्ण अशा रेल्वे मार्गाचा नकाशाही भारतीय रेल्वेच्या मुख्य नकाशावर झळकला आहे. यामुळे आता भारतीय रेल्वेच्या डायरीत लातूर रोड जळकोट बोधन या नवीन उभारण्यात येणा-या मुख्य रेल्वेमार्गाची नोंद झाली आहे. यामुळे लवकरच या रेल्वेमार्गाच्या उभारणीला प्रारंभ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded Accident|ट्रक-टँकरच्या अपघातात एक जण जागीच ठार
00:32
Video thumbnail
Nanded Murder|सोनखेड पेट्रोल पंपावर प्लंबरचा खून;मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
00:34
Video thumbnail
Nanded |इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर; फळबागेतून दरवर्षी लाखोंची कमाई
04:26
Video thumbnail
विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा: विद्यार्थ्यांची कविता #Maharashtra #VilasraoDeshmukh #Marathi
02:48
Video thumbnail
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद
00:37
Video thumbnail
अभिनेत्री सारा अर्जुनने वडिलांसह घेतले बाबा महाकालांचे दर्शन; उज्जैनच्या 'भस्म आरती'त झाली लीन!
00:30
Video thumbnail
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने गोदावरीत बोट बुडाली; दोन महिलांना गमवावा लागला जीव.
00:34
Video thumbnail
मांजराचा 'दिलजले' अंदाज! गर्लफ्रेंडला दुसऱ्या बोक्यासोबत पाहून उंदराला दिलं जीवदान, व्हिडिओ व्हायरल!
00:23
Video thumbnail
येलदरी जलाशयात मासेमारी नाकारल्याने मच्छीमारांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न
03:22
Video thumbnail
Nanded|कोळशाच्या दलालीत हात काळे करायचे नाही-आ.हेमंत पाटील
03:09
Video thumbnail
Latur|तुकाराम मुंडेंचा धडाका सुरूच; लातूरचे FDA प्रशासन अजूनही झोपेत?
02:05
Video thumbnail
Latur Traffic Police|जीवघेण्या पद्धतीने वाहन अडवणारा ट्रॅफिक पोलीस निलंबित...
02:28
Video thumbnail
Latur MIDC|22 तासांच्या झुंजीनंतर MIDC मधील भीषण आग आटोक्यात; 5 कोटींचे नुकसान
03:48
Video thumbnail
धावत्या बाईकस्वाराला पाडणे पडले महागात; लातूरमध्ये 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर ट्रॅफिक पोलीस निलंबित!
00:19
Video thumbnail
Latur|अण्णा हजारेंचा 90 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
02:13

Latest news