22.2 C
Latur
Friday, October 11, 2024
Homeअंतरराष्ट्रीयरोहिंग्या मुस्लिमांचे पुनर्वसन बांगलादेश सरकार करणार

रोहिंग्या मुस्लिमांचे पुनर्वसन बांगलादेश सरकार करणार

ढाका : वृत्तसंस्था
पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी दक्षिण आशियामध्ये राहणा-या रोहिंग्या मुस्लिमांचे जलद पुनर्वसन करण्याची घोषणा केली आहे.
मुहम्मद युनूस म्हणाले की, म्यानमार आणि त्याच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये सातत्याने वाढणा-या हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. म्यानमारचे सत्ताधारी सैन्य आणि देशातील बौद्ध बहुसंख्य असलेले शक्तिशाली वांशिक मिलिशिया अरकान आर्मी यांच्यातील लढाई तीव्र झाल्याने सुमारे आठ हजार रोहिंग्या मुस्लिमांनी बांगलादेशात पलायन केले आहे.
बांग्लादेशच्या कॉक्स बाजार जिल्ह्यातील छावण्यांमध्ये आधीच राहणा-या दहा लाखांहून अधिक रोहिंग्या निर्वासितांमध्ये हे सर्वजण सामील झाले आहेत. त्यापैकी बहुतांश २०१७ साली म्यानमार लष्कराच्या नेतृत्वाखालील क्रॅकडाउनमधून पळून आलेले आहेत.
बांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद तौहीद हुसेन म्हणाले की, बांग्लादेश आणखी रोहिंग्या निर्वासितांना स्वीकारू शकत नाही. मात्र हुसैन यांनी भारत आणि इतर देशांमध्ये राहणा-या लोकांना परत घेण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR