लातूर : प्रतिनिधी
एकमतचे निलंगा तालुका प्रतिनिधी लक्ष्मण पाटील यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा उदगीरच्या वतीने निर्र्भीड पत्रकार म्हणून पुरस्कार देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
यावेळी माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे, तहसीलदार राम बोरगावकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी, मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत ,नितीन शिंदे ,अशोक देडे, अशोक हनुमंते, अफसर कारभारी, केज तालुकाध्यक्ष पाटील, प्राचार्य राजकुमार नावंदर, अॅड बिपिन पाटील, युवा उद्योजक बाळासाहेब पाटोदे, युवा उद्योजक योगेश शिंदे, पंचायत समितीची माजी सभापती सोपान ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.
















