धुळे : लळिंग घाट परिसरात पहाटेच्या सुमारास भीषण तिहेरी अपघात घडला. या दुर्घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल २६ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला रेतीने भरलेला डम्पर आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली.
अपघातानंतर टोल कर्मचारी व पेट्रोलिंग पथक घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढण्याचे काम करत होते. दरम्यान, भरधाव वेगाने येणा-या ट्रॅव्हल्स बसने अपघातग्रस्त ट्रक आणि डम्परला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत ट्रॅव्हल्सच्या केबिनमध्ये बसलेल्या काही जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या २० ते २२ जणांना तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस व प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असून अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या २० ते २२ जणांना तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
















