26.3 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeमहाराष्ट्रलव्ह जिहादविरोधात कायदा करणार

लव्ह जिहादविरोधात कायदा करणार

पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती
मुंबई : प्रतिनिधी
लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाठी सक्तीच्या धर्मांतर विरोधी कायदा करावा, अशी मागणी भाजपाच्या काही आमदारांनी लावून धरली होती. ती मान्य करत राज्य सरकारने पावले उचलली असून पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमली आहे. ही समिती अन्य राज्यांनी केलेल्या लव्ह जिहाद विरोधी तसेच सक्तीच्या अथवा फसवणूक करून केलेल्या धर्मांतरविरोधी कायद्यांचा अभ्यास करून कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारला शिफारस करणार आहे.

राज्यात लव्ह जिहादच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचा आरोप अनेक लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला होता. श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर या प्रकरणाने उचल खाल्ली होती. आता आंतरधर्मीय विवाहाच्या माध्यमातून उघडकीस येणा-या लव्ह जिहादच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली असून पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमली आहे. ही समिती अन्य राज्यांनी लव्ह जिहाद विरोधी तसेच सक्तीच्या अथवा फसवणूक करून केलेल्या धर्मांतरविरोधी कायद्यांचा अभ्यास करून कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारला शिफारस करणार आहे.

राज्यात गेल्या काही वर्षात आंतरधर्मीय विवाहावरून लव्ह जिहादच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून विशेषत: हिंदुत्ववादी संघटनाकडून होत होती. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने अन्य राज्यांनी केलेल्या लव्ह जिहाद विरोधी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती गठीत केली आहे. गृह विभागाने शुक्रवारी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR