लहान आकाचे एन्काऊंटर होऊ शकते

मुंबई : प्रतिनिधी
खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सीआयडी कोठडीत असताना विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार रोहित पवार यांनी बीड पोलिसांवर आरोप केले आहेत. बीडच्या पोलिसांकडून वाल्मिक कराडला खास सेवा दिली जात असल्याचा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आरोप केला.

विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वाल्मिक कराडचे पोलिस ठाण्यात लाड सुरू असल्याची एक्स मीडियावर पोस्ट करून आरोप केला. त्यामध्ये म्हटले, महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मिक कराड येत आहे. त्यामुळे बीड पोलिस स्थानकात नवीन पाच पलंग आले का? असा प्रश्न विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स मीडियावरून उपस्थित केला.

हळूहळू त्याला सगळेच मिळणार- पुढे वडेट्टीवार यांनी म्हटले, वाल्मिक कराड पोलिस कोठडीमध्ये असताना पाच पलंगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटातही नसतात. आरोपीचे लाड पुरवण्याची ही सुरुवात आहे. हळूहळू टीव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेलमधील जेवण सगळेच मिळणार आहे.

विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वडेट्टीवार यांनी म्हटले, वाल्मिक कराडवर सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? तसे असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. त्याने आजवर पोलिसांना धाकात ठेवले. ते पोलिस त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने कराडवर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे, अन्यथा गांभीर्यपूर्वक कारवाई करा. कराडवर मकोका अंतर्गत गुन्हाही दाखल झालेला नाही .

काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, आरोपीवर कशाप्रकारे वेळेत आरोपपत्र दाखल करतात याची उत्सुकता आहे. एसआयटी हा केवळ फार्स ठरू नये. या प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. आधीच एसआयटी नेमायला हवी होती. वाल्मिक कराडचे लाड का केले जात आहेत? मोठ्या आकाला (मंत्री धनंजय मुंडे) वाचविण्याकरिता लहान आकाचे (वाल्मिक कराड) एन्काऊंटर होऊ शकते . धनंजय मुंडेंबाबत दादांचे मौन पाहता मुंडेंची विकेट काढली जाऊ शकते. भुजबळांचा टीममध्ये समावेश केला जाईल का?

रोहित पवारांची बीड पोलिसांवर टीका
पोलिस स्टेशनमध्ये स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, हे अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत, असे राष्ट्रवादीचे (एसपी) आमदार रोहित पवार यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले. नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलिस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी. त्याचबरोबर उशी, पंखा, एसीदेखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा, असा टोला रोहित पवार यांनी पोलिसांना लगावला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27
Video thumbnail
Latur|‘तुम से ना हो पायेगा’! अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; लातूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
07:57
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक संतप्त; हदगावमध्ये बॅनर फाडले
00:33
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर आंदोलनाची धार वाढली? बरडशेवाळ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको
00:33
Video thumbnail
Nanded|उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला! पावसाअभावी नांदेडच्या शेतकऱ्याची हतबलता
02:06
Video thumbnail
Nanded|मराठवाड्याचा मुक्ती संग्राम पाठ्यपुस्तकात घ्या! नांदेडमधून शासनाकडे मोठी मागणी
03:26
Video thumbnail
Latur|हातातोंडाशी आलेला घास गेला! लातूरमध्ये पाण्याअभावी उभी पिकं करपली
03:42
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
07:57
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
10:46
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:02
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
16:29

Latest news