21.7 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeमहाराष्ट्रलाडकीच्या खात्यात २१०० येणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

लाडकीच्या खात्यात २१०० येणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात प्रति महिना १५०० रुपयांचे मानधन जमा केले जाते. या योजनेअंतर्गत लाडकीच्या खात्यावर २१०० रुपये देऊयात, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे. आता यावरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठे वक्तव्य केले. लाडक्या बहिणींचे २१०० रुपये करणार असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहे. मी जे बोलतो ते करून दाखवतो असेही ते म्हणाले. महायुतीने विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती मात्र अजूनही ती पूर्ण केलेली नाही.

मात्र आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचा शब्द दिला आहे.

माझ्या आईची काटकसर आणि माझ्या पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पाहिले होते, म्हणून मी याचा विचार करून महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. १५०० रुपये लाडक्या बहिणींना देतो त्याच्या अनेक सक्सेस स्टोरी आहेत. आता, १५०० रुपयांचे २१०० रुपये योग्यवेळी करणार, हा शब्द लाडक्या बहिणींना दिलेला आम्ही पाळणार आहोत, मी बोलतो ते करून दाखवतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR