13.7 C
Latur
Friday, November 14, 2025
Homeमहाराष्ट्रलाडकीच्या खात्यावर ३००० दिवाळीत?

लाडकीच्या खात्यावर ३००० दिवाळीत?

सप्टेंबर-ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी
ऑक्टोबर महिना सुरु झाला आहे. पहिला आठवडादेखील संपला तरही अद्याप लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरच्या हप्त्याची महिला वाट पाहत आहेत. दरम्यान, आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार असल्याच्याही चर्चा सुरु आहे. याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, ऑक्टोबरदेखील सुरु झाला आहे आणि ऑक्टोबरचेही पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे.दरम्यान, लवकरच हे पैसे दिले जाऊ शकतात.

मागील अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते लांबणीवर जात आहेत. त्यामुळे या महिन्याचाही हप्ता लांबणीवर गेल्याने काही आश्चर्य वाटत नाहीये. मात्र, अजूनही माहिती दिलेली नाही, त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
लाडकी बहीण योजनेत सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येऊ शकतो. सणासुदीचा मूहूर्त साधत महिलांना ३००० रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. दिवाळीत हे पैसे महिलांच्या खात्यात येऊ शकतात. राज्य सरकार दिवाळीचा मूहूर्त साधत पैसे देतील, अशी आशा महिलांच्या मनात आहे. दरम्यान, याबाबत आदिती तटकरे लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे.

या महिलांनाच मिळणार सप्टेंबरचा हप्ता
लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. आता फक्त ज्या महिलांनी केवायसी केली आहे त्यांनाच सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य केले आहे. यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्याआधी महिलांनी केवायसी करण्याचे आवाहन आदिती तटकरेंनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR