24.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्र‘लाडकी बहीण’साठी आदिवासींच्या बजेटवर डल्ला

‘लाडकी बहीण’साठी आदिवासींच्या बजेटवर डल्ला

नाशिक : प्रतिनिधी
राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. योजनेवरून विरोधक टीका करताना दिसत आहेत. त्यातच ‘लाडकी बहीण’ साठी आदिवासींच्या पैशावर डल्ला मारला असे आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय नेते हे आखाड्यात उतरले आहेत. त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेला कोणते पैसे दिले जातात याबद्दलही मोठा खुलासा केला.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जे करायला निघाले, ते कायदेशीर नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात सव्वा लाख बोगस आदिवासी असल्याचे आढळले. आदिवासी समाजाचे मोर्चे आले, भरती, जागा ताबडतोब भरणे या सर्व गोष्टी झाल्या. पण लाडक्या बहिणीसाठी आदिवासींचे बजेट वर्ग केले जात आहे, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकरांनी केला.

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी सध्या अनुदानाचे पैसे मिळतील का याची शाश्वती नाही कारण लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागत आहे, असे वक्तव्य केले होते. आता यावरून आम्ही नागपुरात आदिवासी परिषद घेतली. सध्या आम्ही राज्यातील सर्वांना एकत्र करत आहोत. विविध संघटना एकत्र करत आहोत. आम्ही निवडणूक लढत आहोत. धनगर समाजाने पायावर धोंडा पाडून घेतला आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वाच्च न्यायालयाने याबद्दल निर्णय दिला आहे. आम्ही काही धनगर समाजातील नेत्यांना कोर्टात जाऊ नका, असे सांगितले होते. धनगर आणि धनवट हे दोन वेगळे समाज आहेत. ते एकत्र आणता येत नाहीत. त्यामुळे थेअरीच्या दृष्टिकोनातून निकाल काढता येणार नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR