पुणे : प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत. सरसकट सर्वांना लाभ देणे चुकीचं होते, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. योजनेतील अर्जांच्या पडताळणीचे काम सुरु असून यापुढे फक्त गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते सोमवारी प्रसारमध्यमांशी बोलत होते.
यावेळी अजित पवार यांनी पुण्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी हगवणे बंधुंना दिलेल्या शस्त्र परवान्याविषयी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, पुणे शहरामध्ये अशाप्रकारे कोणाला शस्त्र परवाना देण्यात आला आहे, हे तपासले जाईल.
मधल्या काळात मी बीडचा पालकमंत्री झालो तेव्हा अशा तक्रारी आल्या तेव्हा तिथल्या एसपींनी फेरआढावा घेतला. अनेकांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले. २०२० ते २०२३ कोणाकोणाला लायसन्स दिली गेली, याचा तपास करु. त्यांची पार्श्वभूमी तपासली जाईल असे अजित पवार यांनी सांगितले.