22.2 C
Latur
Tuesday, September 10, 2024
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहिणींच्या खात्यातील पैसे कपात करू नका

लाडक्या बहिणींच्या खात्यातील पैसे कपात करू नका

सरकारकडून बँकांना निर्देश

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा होत आहे. या योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बँकेच्या खात्यात ३००० रुपये जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या योजनेअंतर्गत दोन महिन्यांचा हप्ता एकाच वेळी महिलांना देण्यात आला.

काही महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला खरा पण कर्ज थकित असल्यामुळे बँकेकडून त्यांचे पैसे कपात करण्यात आले. त्यामुळे या महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे. अशामध्ये सरकारने या लाडक्या बहिणींना दिलासा दिला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यातील पैसे कपात करू नका, असे निर्देश सरकारने बँकांना दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नयेत, अशा सूचना महिला व बालविकास विभागाकडून बँकांना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत.

लाभार्थ्याचे कर्ज थकित असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत. कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे, असेही निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR