24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहिणींसाठी आता हेल्पलाईन

लाडक्या बहिणींसाठी आता हेल्पलाईन

१८१ क्रमांकावर करा संपर्क, शंकांचे निरसन करता येणार
मुंबई : प्रतिनिधी
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली. लाडक्या बहिणींच्या शंकांचे निरसन करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक १८१ जारी करण्यात आला आहे. लाडक्या बहिणींनी आवश्यकता असल्यास या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत. या आणि योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी १८१ या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन १८१ या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे. सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आदिती तटकरेंनी म्हटले आहे.

अंगणवाडी सेविकांकडून
प्रत्यक्ष पडताळणी होणार
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दि. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु यात चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे आता लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR