लातुरात कुरिअर पार्सलचा स्फोट

२ जखमी, १ गंभीर, पोलिस, एटीएस, बीडीडीएसच्या पथकाची घटनास्थळी धाव
लातूर : प्रतिनिधी
लातूरातील उद्योग भवन परिसरात उमाटे इंटरनॅशनल कुरिअरच्या पार्सलमध्ये दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १०.१५ च्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात २ कर्मचारी जखमी झाले. यातील एक गंभीर आहे. या स्फोटामध्ये पार्सलच्या वाहनाचे छत आणि खालचा भाग फाटला. यावरून स्फोटाची तीव्रता लक्षात येते. या घटनेने लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस, एटीएस, बीडीडीएस, स्थानिक गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक एक्स्पर्टची टिम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी घटनास्थळाची श्वान पथकाद्वारे आणि मेटल डिटेक्टरच्या सहकायाने पूर्ण परिसराची तपासणी केली. तसेच फॉरेन्सिक एक्स्पर्टच्या टिमने घटनास्थळावरून विविध नमुने घेतले आहेत. गण, गण पावडर आणि छ-यांचा स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नेहमीप्रमाणे उमाटे कुरिअरचे काम शनिवारी सकाळी सुरु झाले. टेम्पोमधून कुरिअरचे पार्सल उतरवले जात असताना हा स्फोट झाल्याची पोलिसांनी माहिती दिली. दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही व्हीडिओ समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरहून लातूरला हे पार्सल आले होते. याच पार्सलच्या बॉक्सचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अमोल तांबे, सहायक पोलिस अधीक्षक मेघना आय. एन., अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक संतोष पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. हे पार्सल दोन दिवसांपूर्वी कुरिअर सर्व्हिसमध्ये आले होते.

उन्हामुळे किंवा
घर्षणामुळे स्फोट?
उन्हामुळे किंवा घर्षणामुळे या पार्सलचा स्फोट झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र, स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. दरम्यान घटनास्थळी फॉरेन्सिक एक्स्पर्टच्या टीमने परिसरातून नमुने गोळा केले आहेत तर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक आणि श्वान पथकाच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे.

पुराव्यांच्या विश्लेषणानंतर स्फोटाचे कारण समजेल
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, कुरिअरच्या वाहनातून पार्सल उतरवत असताना स्फोट झाला. उपलब्ध पुरावे, साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. पुराव्यांच्या विश्लेषणानंरतरच स्फोटाचे कारण समजेल, असे ते म्हणाले.

संभाजीनगरहून पिस्टलची डिलेव्हरी
छत्रपती संभाजीनगरहून लातूरला बंदूक घरसाठी हे पार्सल आले होते. पार्सलद्वारे एअर पिस्टलची डिलेव्हरी होती. कुरिअर कोणी पाठवले, कोणाला पाठवले, कशासाठी पाठवले याचाही तपास केला जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43
Video thumbnail
Solapur Well Collapse: आंबे गावात विहीर खचली; चार जण मातीखाली अडकले, बचावकार्य सुरू
01:16
Video thumbnail
Latur Accident News: टाका पाटीजवळ भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
00:41
Video thumbnail
Latur Bank Election : लातूरचा मतदार सन्मान गहाण ठेवणारा नाही – आमदार अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य
05:40
Video thumbnail
Latur District Bank Election: योग्य उमेदवाराला मतदान करा – दिलीपराव देशमुखांचे आवाहन
01:10
Video thumbnail
Nanded News: आंतरपिकात गांजाची लागवड; 9 लाख 24 हजारांचा गांजा जप्त, किनवटमध्ये LCB ची कारवाई
00:43
Video thumbnail
Latur District Bank Election: धमक्या, द्वेषाशिवाय विरोधकांनी काही केलं नाही – धीरज देशमुखांचा प्रहार
04:38
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59

Latest news